दारु पिण्यास केली मनाई: पतीचा पत्नीवर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 05:00 AM2020-05-24T05:00:00+5:302020-05-24T05:01:03+5:30

सूरजच्या पत्नीने त्याला दारु पिण्यास मनाई केली होती. घटनेच्या दिवशी सूरजनेच पत्नीला तू पण दारू पी, असे बोलला. याचवेळी महिला घराबाहेर निघाली. तसेच ‘तुमचे हे वागणे रोजचेच आहे. मी आपल्या भावाला फोन करून सांगते’ असे म्हटले असता सूरज पत्नीच्या मागे धावला. तिचे केस ओढून हातात असलेल्या चाकूने तिच्या मानेवर, नाकावर व गालावर वार केले.

Prohibition of drinking alcohol: Husband stabs wife | दारु पिण्यास केली मनाई: पतीचा पत्नीवर चाकूहल्ला

दारु पिण्यास केली मनाई: पतीचा पत्नीवर चाकूहल्ला

Next
ठळक मुद्देमोहाडी तालुक्यातील सुकळी येथील घटना । जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पत्नीने पतीला दारु पिण्यास मनाई केल्याने संतापाच्या भरात पतीने पत्नीवर चाकूने वार केले. यात सदर महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना मोहाडी तालुक्यातील सुकळी येथे घडली.
महिलेच्या तक्रारीवरून मोहाडी पोलिसांनी सूरज रामनाथ मारवे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सूरजच्या पत्नीने त्याला दारु पिण्यास मनाई केली होती. घटनेच्या दिवशी सूरजनेच पत्नीला तू पण दारू पी, असे बोलला. याचवेळी महिला घराबाहेर निघाली. तसेच ‘तुमचे हे वागणे रोजचेच आहे. मी आपल्या भावाला फोन करून सांगते’ असे म्हटले असता सूरज पत्नीच्या मागे धावला.
तिचे केस ओढून हातात असलेल्या चाकूने तिच्या मानेवर, नाकावर व गालावर वार केले. तसेच जीवाने मारून टाकीन अशी धमकी दिली. यात ती गंभीर जखमी झाली. तिला प्रथम ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र प्रकृती अस्तव्यस्त असल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वैद्यकीय अहवाल तथा महिलेच्या तक्रारीवरून मोहाडी पोलिसांनी सूरज मारवे विरुद्ध भादंविच्या ३०७, ५०४, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक थेरे करीत आहे.

दारूमुळे अनेकांच्या जीवनाची राखरांगोळी झाली आहे. दारुच्या आहारी गेलेला व्यक्ती केव्हा काय करेल याचा नेम नसतो. मोहाडी तालुक्यातील सुकळी येथे घडलेला प्रकारही दारुच्या आहारी जाण्यातूनच घडला. याचा फटका मात्र महिलांनाच जास्त सहन करावा लागतो. अशा घटनांमधूनही नागरिक बोध घेत नाहीत, हीच खरी शोकांतिका आहे. जनजागृती केल्यानंतरही मद्यपी शौकीनांची संख्या कमी झालेली नाही. दारूच्या दुकानात लागलेल्या रांगा पाहूनच अनेक प्रश्न निर्माण होत आहे.
 

Web Title: Prohibition of drinking alcohol: Husband stabs wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.