भंडाऱ्यात काँग्रेस कमेटीतर्फे निषेध मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 10:43 PM2018-04-16T22:43:24+5:302018-04-16T22:43:24+5:30

जम्मू काश्मीरमधील बलात्कार प्रकरण आणि उत्तरप्रदेशातील बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरात तसेच महाराष्ट्र राज्यात काँग्रेसच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.

Prohibition of protest by the Congress Committee in the store | भंडाऱ्यात काँग्रेस कमेटीतर्फे निषेध मोर्चा

भंडाऱ्यात काँग्रेस कमेटीतर्फे निषेध मोर्चा

Next
ठळक मुद्देकेंद्र व राज्य सरकारविरोधी घोषणा : महिलावंर होणाºया वाढत्या अत्याचाराचा विरोध

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जम्मू काश्मीरमधील बलात्कार प्रकरण आणि उत्तरप्रदेशातील बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरात तसेच महाराष्ट्र राज्यात काँग्रेसच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. भंडाऱ्यात जिल्ह्याध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांच्या नेतृत्वात काँग्रेसने देशामध्ये महिलावंर होणाऱ्यां वाढत्या अत्याचाराचा विरोध करीत केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काढत बलात्काराच्या घटनेचा निषेध केला. यावेळी मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते.
भंडाºयात त्रिमुर्ती चौक ते गांधी चौक असा कॅडेल मार्च निघाला. या मोर्चात भंडाऱ्यातील तरूणाईने तसेच जनतेनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. घोषणाबाजी करत दोन्ही घटनांचा निषेध करण्यात आला. जम्मू काश्मीरमधील बलात्कार प्रकरणातील चिमुरडीला न्याय मिळावा आणि उत्तरप्रदेशातील बलात्कार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी मार्चेकरांनी केली. काँग्रेसकडून या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काढण्यात आला. मोर्च्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जि.प. अध्यक्ष रमेश डोंगरे, माजी आमदार आनंदराव वंजारी, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, जि.प.सभापती प्रेम वनवे, विकास राऊत, प्रकाश पचारे, अजय तुमसरे, डॉ. विनोद भोयर, अ‍ॅड. शिशिर वंजारी, प्रशांत देशकर, जि.प. सदस्य प्यारेलाल वाघमारे, अनिक जमा पटेल, सचिन घनमारे, राजू वंजारी, तालुकाध्यक्ष राजकपूर राऊत, आवेश पटेल, नगरसेवक शमीम शेख, मुकूंद साखरकर, विनित देशपांडे, रिजवान काझी, कमलेश बाहे, भावना शेंडे, ज्योती गणवीर, जयश्री बोरकर, प्रसन्न चकोले, भावना रंगारी, ज्योती सुखदेवे, आशा गिरीपुंजे, इमरान पटेल, चोलाराम गायधने, सचिन फाले, मंगेश हुमणे यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Prohibition of protest by the Congress Committee in the store

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.