आदिवासी संघटनांकडून निषेध

By admin | Published: April 2, 2016 12:36 AM2016-04-02T00:36:00+5:302016-04-02T00:36:00+5:30

मंत्रालयत सामान्य प्रशासन विभागात कार्यरत असलेले उपसचिव बी.आर. गावीत यांना त्यांच्या कक्षात जावून अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी...

Prohibition by Tribal Organizations | आदिवासी संघटनांकडून निषेध

आदिवासी संघटनांकडून निषेध

Next

मुख्यमंत्र्यांना निवेदन : आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनची मागणी
भंडारा : मंत्रालयत सामान्य प्रशासन विभागात कार्यरत असलेले उपसचिव बी.आर. गावीत यांना त्यांच्या कक्षात जावून अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी त्याच्याशी शाब्दिक बाचाबाची करून मारहाण केली. ही घटना निंदनीय आहे. घडलेल्या प्रकरणच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून आमदार बच्चू कडू यांच्या विरूद्ध आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनने निषेध व्यक्त केला.
आमदार बच्चू कडू यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यातील कर्मचारी अशोक जाधव यांना वांद्रे येथील शासकीय निवासस्थान वर्षभरासाठी देण्याच्या मागणी वरून उपसचिव बी.आर. गावीत यांच्याशी हुज्जत घालणे योग्य नव्हते.
आमदार बच्चू कडू हे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना नियमानुसार याबाबतची तक्रार आपणाकडे करता आली असती परंतु त्यांनी कशल्याही प्रकारचा विचार न करता एका शासकीय अधिकारी व आदिवासी समाजाच्या अधिकाऱ्यां मारहाण करून भ्याड कृत्य केले आहे.
त्यामुळे आदिवासी समाजचा कृत्याच्या निषेध करित आहे. शासन स्तरावरून त्यांचे विरूद्ध एफआयआर दर्ज करून तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा आदिवासी समाजाच्या सर्व संघटना या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन उभारेल, असा इशाराही देण्यात आला आहे. (प्रतिनिधी )

Web Title: Prohibition by Tribal Organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.