प्रकल्प समाप्ती निर्गमन प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:06 AM2021-03-04T05:06:46+5:302021-03-04T05:06:46+5:30
कार्यक्रमप्रसंगी कोरोनाबाबतीत शासनाने दिलेल्या गाइडलाइनचे पालन करण्यात आले. मास्क, सॅनिटायझरचा उपयोग करण्यात आला. पाणलोट समिती आणि बचतगटाच्या विकास कार्याकरिता ...
कार्यक्रमप्रसंगी कोरोनाबाबतीत शासनाने दिलेल्या गाइडलाइनचे पालन करण्यात आले. मास्क, सॅनिटायझरचा उपयोग करण्यात आला. पाणलोट समिती आणि बचतगटाच्या विकास कार्याकरिता राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या योजनांची माहिती विस्तृतपणे सांगण्यात आली. शेतकरी व नागरिक यांना आर्थिक विकास कार्यासाठी शासन अनेक कल्याणकारी योजना राबवीत असले तरी योजनांची माहिती नसल्याने ग्रामीण भागातील लाभार्थी वंचित राहत आहेत. त्यांच्या दारापर्यंत योजना पोहोचत नाही. पाणलोट समित्या शेतकऱ्यांचे उत्थानाचे कार्य करीत आहे. गावांचे समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. वैयक्तिक योजना असल्या तरी त्या दिशेने प्रयत्न केले जात नाही. प्रशिक्षणाच्या माध्यमातून या योजना नागरिकांच्या दारापर्यंत पोहचल्या पाहिजेत, अशी अपेक्षा मार्गदर्शकांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महेंद्र मेश्राम यांनी केले.