जिल्ह्यातील ३९ पोलिसांना पदोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 10:22 PM2018-10-05T22:22:42+5:302018-10-05T22:23:10+5:30

जिल्हा पोलीस दलातील ३९ कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी पदोन्नती बहाल केली आहे. त्यात सहा सहायक फौजदार, १३ पोलीस हवालदार, २० पोलीस नाईकांचा समावेश आहे. पदोन्नती झालेल्या सर्व सहायक फौजदाराच्या खांद्यावर स्टार लावण्यात आले.

Promotion to 39 police in the district | जिल्ह्यातील ३९ पोलिसांना पदोन्नती

जिल्ह्यातील ३९ पोलिसांना पदोन्नती

Next
ठळक मुद्देएसपींचे आदेश : सहा सहायक फौजदार, १३ हवालदार, २० नाईक

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा पोलीस दलातील ३९ कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी पदोन्नती बहाल केली आहे. त्यात सहा सहायक फौजदार, १३ पोलीस हवालदार, २० पोलीस नाईकांचा समावेश आहे. पदोन्नती झालेल्या सर्व सहायक फौजदाराच्या खांद्यावर स्टार लावण्यात आले.
पोलीस दलातील हवालदार तुकाराम गभने, लक्ष्मण चोपकर, अरुण गंथाळे, धनराज जगनाडे, राजेश पोहरकर, सिद्धेश्वर थोटे यांना सहायक फौजदार या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. पोलीस नाईक दर्जाच्या सुनील भोवते, मंगल कुथे, टिकाराम कोरे, रमेश खोब्रागडे, दिनेश ठाकरे, तेजराम आस्वले, ईरशाद खान, केशव चचाने, संजय वाकलकर, चंद्रमणी तभाणे, राजेश बांते, राजेश पांडे, कांचन टेंभूर्णे यांना हवालदारपदी बढती देण्यात आली.
जिल्ह्यातील २० पोलीस शिपायांना नाईक पदावर बढती देण्यात आली. त्यात पुरूषोत्तम थेर, प्रशांत तांडेकर, रसिका कंगाले, शिल्पा शेंडे, मिलिंद गभने, माधुरी रामटेके, श्रीकांत मस्के, किशोर हटवार, रामकृष्ण बावनकुळे, सतीश सिंगनजुडे, इंद्रायनी येलमुले, प्रदीप बोरकर, अतुल रायपुरकर, ईश्वर कढव, घनश्याम कोडापे, प्रमोद टेकाम, हेमलता आकरे, लक्ष्मी थोटे, मंगेश शिवनकर यांचा समावेश आहे. पदोन्नत झालेल्या या सर्वांना नियमानुसार वेतन वाढ मिळणार आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी एका समारंभात सर्व सहायक फौजदारांच्या खांद्यावर स्टार तसेच पोलीस हवालदार व नाईक यांच्या खांद्यावर पदनिदर्शक फित चढवून कौतूक केले. मिळालेल्या जबाबदारीचे भान ठेवून समाजाच्या विकासासाठी कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन केले.

Web Title: Promotion to 39 police in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.