दोन राज्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग आणणार समृद्धी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 08:57 PM2018-11-18T20:57:14+5:302018-11-18T20:57:30+5:30
रस्ते विकासाचे सशस्त माध्यम आहे. मनसर-बालाघाट सिवनी या दरम्यान दोन राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ चे काम जोमात सुरु आहे. यामुळे हा मार्ग समृद्धी महामार्ग ठरणार आहे. सध्या मनसर-गोंदिया रस्ता दुपदरीकरणाचे खोदकामाला सुरुवात झाली आहे.
मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : रस्ते विकासाचे सशस्त माध्यम आहे. मनसर-बालाघाट सिवनी या दरम्यान दोन राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ चे काम जोमात सुरु आहे. यामुळे हा मार्ग समृद्धी महामार्ग ठरणार आहे. सध्या मनसर-गोंदिया रस्ता दुपदरीकरणाचे खोदकामाला सुरुवात झाली आहे. केंद्रीय राष्ट्रीय राजमार्ग विभागाने हिरवी झेंडी दिली आहे. उत्तर भारतात जाण्याकरिता हा एक प्रमुख रस्ता ठरणार आहे.
नागपूर-मनसर-जबलपूर हा राष्ट्रीय महामार्ग आहे. मनसर ते गोंदिया १५१ कि.मी. रस्ता यापूर्वी राज्यमार्ग होता. मनसर-बालाघाट-सिवनी पर्यंत दोन राज्यांना जोडणारा रस्त्याला केंद्रीय राष्ट्रीय राज्यमार्ग मंत्रालयाने हिरवी झेंडी दिली. हा रस्ता समृद्धी महामार्ग ठरणार आहे. मनसर ते गोंदिया दरम्यान रस्त्याचे दुपदरीकरण खोदकामाला नुकतीच सुरुवात करण्यात आली. सदर राष्ट्रीय महामार्ग मनसर-तुमसर-तिरोडा-गोंदिया-बालाघाट व सिवनी असा आहे.
रस्ता नूतनीकरण कामाची किंमत ३१४ लक्ष एवढी आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोदकामाचा त्यात समावेश असून त्यास समतल करून भराव करण्याची कामे आहेत. ३० नोव्हेंबर २०१७ ला कामे सुरु करण्याचा आदेश प्राप्त झाला होता. तर काम पूर्णत्वाची तारीख २५ मे २०१८ होती. तसे खापा शिवारातील फलकावर नमूद केले आहे. परंतु शेतकºयांच्या जमिनीचे हस्तांतरण करणे यात बराच वेळ येथे लागल्याचे समजते. सध्या ती कामे पूर्ण झाली आहेत. तिरोडा दरम्यान रस्ता कामाचे सिमेंटीकरण काही दिवसात सुरु करण्यात येणार आहे.
भंडारा जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा जातो. त्या रस्त्याला पर्याय तथा नागपूर - जबलपूर रस्त्याला मनसर येथून सरळ तुमसर-गोंदिया-सिवनी असा पर्याय उपलब्ध येथे होणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे रोड मॅप तयार केला. तुमसर-बालाघाट रस्ता यानंतर पुढच्या टप्प्यात सुरु होणार असल्याची माहिती आहे. सध्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोदकाम सुरु असून सुरक्षेकरिता पिवळी व पांढºया रंगाची रेती भरलेल्या पोती रस्त्याशेजारी काम सुरु असल्याचे दिशादर्शक म्हणून ठेवल्या आहेत.
रात्रीच्या सुमारास येथे धोक्याची शक्यता आहे. रेडीयम पट्ट्या किंवा रेडीयमचे तोरण येथे बांधण्याची गरज आहे. सदर रस्ता वर्दळीचा असून जड वाहतूक या रस्त्याने मोठ्या प्रमाणात राहते. रस्ता खोदकाम एकाच वेळी दोन्ही बाजूला सुरु आहे. निदान एका बाजूचे खोदकाम व भरावानंतर दुसºया बाजूचे खोदकाम व भराव करण्याची गरज आहे. जुना रस्ता राज्य मार्ग असल्याने निमूळता आहे. त्यामुळे वाहनांना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. खबरदारी उपाययोजना येथे करण्याची गरज आहे.
राष्ट्रीय महामार्गामुळे, उद्योग, व्यापार, शेतमालाची आवक तथा पर्यटन उद्योगाला येथे मोठी चालना मिळून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरची वाहतूक कमी होण्यास मदत होणार आहे.