नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येबाबत होणाऱ्या दिरंगाई तपासाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:37 AM2021-08-23T04:37:48+5:302021-08-23T04:37:48+5:30
सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ . नरहरी नागलवाडे होते. तर प्रमुख मार्गदर्शक प्रा . युवराज खोब्रागडे, हिवराज ऊके, प्रा. नरेश आंबिलकर ...
सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ . नरहरी नागलवाडे होते. तर प्रमुख मार्गदर्शक प्रा . युवराज खोब्रागडे, हिवराज ऊके, प्रा. नरेश आंबिलकर यांच्यासह कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे, चंद्रशेखर भिवगडे, डॉ. प्रवीण थुलकर, डॉ. विश्वजील थुलकर, पुरूषोत्तम कांबळे, सूर्यकांत ईलमे, कोठीराम पवनकर, विजय शहारे, गणेश लिमजे, बंडू राघोर्ते, पुरुषोत्तम गायधने, सुषमा बन्सोड, कविता लोणारे, माया बारापात्रे, लिलाधर बन्सोड प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सर्वांनी घटनेचा निषेध करून मारेकऱ्यांचा तत्काळ शोध घेण्यात यावा व त्यांना फाशी देण्यात यावी अशी मागणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक सायबराव राठोड यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. निवेदनात, तपास प्रक्रीया गतीमान करावी, खून एकमेकात गुंतले असल्यामुळे केंद्रिय आणि राज्य सरकारच्या यंत्रणेचा सुसंवाद करून खूनाचा तपास करण्यासाठी एक विशेष टीम गठित करावी, खूनात सहभागी असलेल्या संघटना आणि सूत्रधारांना अटक करावी, हत्याच्या केसेसमध्ये सरकारने निष्णात वकीलाची नियुक्ती करावी, धार्मिक मूलतत्ववादी लोक आणि संघटना यांच्यावर बंदी आणावी, सामाजिक कार्यात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांच्या जीवाचे संरक्षण करण्यासाठी कडक कायदा करावा, अशा मागण्यात नमूद आहेत.