युवकाच्या हत्या प्रकरणाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 11:37 PM2018-05-28T23:37:40+5:302018-05-28T23:37:51+5:30

गुजरातचे राजकोट जिल्ह्यात कचरा वेचण्याचा काम करुन आपले उदरनिर्वाह चालविणाऱ्या दलित दाम्पत्याला चोरी केल्याचा खोटा संशय घेवुन बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत दलित तरुणाचा मृत्यू झाला तर त्याची पत्नी गंभीर दुखापतीमुळे औषधोपचार घेत आहे. या घटनेचा समता सैनिक दल व भाकप साकोली तर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

The protest of the murder of the young man | युवकाच्या हत्या प्रकरणाचा निषेध

युवकाच्या हत्या प्रकरणाचा निषेध

Next
ठळक मुद्देकारवाईची मागणी : समता सैनिक दल व भाकपतर्फे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : गुजरातचे राजकोट जिल्ह्यात कचरा वेचण्याचा काम करुन आपले उदरनिर्वाह चालविणाऱ्या दलित दाम्पत्याला चोरी केल्याचा खोटा संशय घेवुन बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत दलित तरुणाचा मृत्यू झाला तर त्याची पत्नी गंभीर दुखापतीमुळे औषधोपचार घेत आहे. या घटनेचा समता सैनिक दल व भाकप साकोली तर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
याबद्दल महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नावे नायब तहसीलदार पवार यांना शिष्टमंडळामार्फत एक निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकार जरी सबका साथ सबका विकास चा जयघोष करीत असली तरी मागील चार वर्षात भाजप प्रणित नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात दलित आदिवासी व अल्पसंख्याकावरील अत्याचारात वाढच होत आहे. त्याशिवाय महिलावरील अत्याचारात ही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
केंद्रातील सरकार आपलीच आहे. या मानसिकतेतून अत्याचार करण्याचा धाडस अत्याचारी मंडळी करीत आहे. एकंदरीत सरकारच्या एकूण व्यवहार आणि धोरणावरुन हे खरेच आहे, असे वाटते. आता तरी सरकारने दलित आदिवासी व अल्पसंख्याकावर होणाºया अत्याचार प्रकरणात तातडीने कडक कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रपती आणि पंतप्रधानाकडे करण्यात आली आहे.
निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात समता सैनिक दलाचे तालुका प्रमुख बाबुराव मेश्राम, उपप्रमुख ज्योती शहारे, बादशाह मेश्राम, शिवप्रसाद मेश्राम, सुशिला मेश्राम, भाकपचे शिवकुमार गणविर, कॉ. राजू बडोले यांचा समावेश होता. नायब तहसीलदार पवार यांनी तातडीने निवेदन महामहिम राष्ट्रपती व पंतप्रधान यांना पाठविण्याचे आश्वासन दिले.

Web Title: The protest of the murder of the young man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.