सहारनपूर हत्याकांडाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2017 12:46 AM2017-05-31T00:46:44+5:302017-05-31T00:46:44+5:30

उत्तरप्रदेश येथील सहारनपूर येथे घडलेल्या दलित हत्याकांडाचा भंडारा जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्यावतीने निषेध करण्यात आला.

Protest of Saharanpur massacre | सहारनपूर हत्याकांडाचा निषेध

सहारनपूर हत्याकांडाचा निषेध

Next

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागातर्फे निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : उत्तरप्रदेश येथील सहारनपूर येथे घडलेल्या दलित हत्याकांडाचा भंडारा जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्यावतीने निषेध करण्यात आला. याप्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन राष्ट्रपतींना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत अनुसूचित जातीचे जिल्हाध्यक्ष अजय गडकरी यांच्या नेतृत्वात पाठविण्यात आले.
उत्तरप्रदेश येथील भाजपा सरकार व केंद्र सरकार या हत्याकांडातील आरोपींना पाठीशी घालण्याचे काम करीत आहे, असा आरोप केला. यावेळी माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हाध्यक्ष पे्रमसागर गणवीर, जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर, प्रदेश सचिव प्रमोद तितिरमारे, कार्याध्यक्ष मनोहर सिंगनजुडे, जिल्हा परिषद सभापती विनायक बुरडे, तालुका अध्यक्ष राजकपूर राऊत, शहर अध्यक्ष सचिन घनमारे, अनिकजमा पटेल, माजी नगरसेवक धनराज साठवणे, स्नेहल रोडगे, डॉ.दिलीप मेश्राम, माजी नगराध्यक्ष अमरनाथ रगडे, भावना शेंडे, प्रवीण भोंदे, गणेश लिम्जे, जनार्धन निंबार्ते, विनोद जगनाडे, परमेश वलके, शंकर राऊत, जिल्हा परिषद सदस्य प्रेमदास वनवे, सचिन फाले, मंगेश हुमणे, प्रीती बागडे, पिसाराम चोपकर, आशीष पात्रे, जिल्हा परिषद सदस्य के.के. पंचबुद्धे, सुनिल गिरेपुंजे, छाया पटले, महेंद्र निंबार्ते, प्रशांत देशकर, नगराध्यक्ष स्वाती निमजे, येशपाल कामठे, शर्मील बोदेले, सुरेश गोंनाडे, हिरामन लांजेवार, मारबते आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Protest of Saharanpur massacre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.