शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ द्या
By Admin | Published: June 25, 2016 12:25 AM2016-06-25T00:25:34+5:302016-06-25T00:25:34+5:30
व येथील प्रकरण : भोंडेकर यांची मागणी पवनी : तालुक्यातील शेतकरी कर्जाच्या बोझ्याखाली पिसला जात असून निसर्गाच्या दृष्टचक्रमुळे शेतकरी सावकाराच्या जाळ्यात ओढला जात आहे.
आसगाव येथील प्रकरण : भोंडेकर यांची मागणी
पवनी : तालुक्यातील शेतकरी कर्जाच्या बोझ्याखाली पिसला जात असून निसर्गाच्या दृष्टचक्रमुळे शेतकरी सावकाराच्या जाळ्यात ओढला जात आहे. राष्ट्रीयकृत बँकेत मात्र सामान्य शेतकऱ्याला परत पाठवित आहेत. त्यासाठी माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आसगाव येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत शेतकऱ्यांना कर्ज देण्यासंबंधात विचारपूस केली.
शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार आमदाराने विचारपुस करून शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी केली. शेतकरी निसर्गाच्या दृष्टचक्रात सापडला असून यावर्षी दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यासमोर उभे आहे.
सावकारी खाजगी पाशातून शेतकऱ्यांची सुटका होण्याच्या दृष्टीने शासनाने प्रत्येक खातेदाराला पिककर्ज वाटपाचा मोठा कार्यक्रम हाती घेतला होता.
मात्र प्रशासकीय उदासीनतेपोटी हा कार्यक्रम पाहिजे त्या प्रमाणात यशस्वी होऊ शकला नाही. याकरिताच पालकमंत्र्याच्या आदेशानुसार शेतकऱ्यांना पिककर्ज अगदी वेळेवर उपलब्ध करून देण्याबाबत आ. भोंडेकर २३ जूनला पवनी तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यांचेसोबत तालुकाअध्यक्ष विजय काटेखाये, युवा सेनेचे तालुका अध्यक्ष बंडू फुलबांधे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)