रोहोयो मजुरांना आर्थिक मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:44 AM2021-04-30T04:44:13+5:302021-04-30T04:44:13+5:30
भंडारा : पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्र शासन प्रशासनाने वेळीच दखल घेऊन तथा मानवीय दृष्टिकोनातून सहानुभूती पूर्वक गांभीर्याने विचार विनिमय करून ...
भंडारा : पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्र शासन प्रशासनाने वेळीच दखल घेऊन तथा मानवीय दृष्टिकोनातून सहानुभूती पूर्वक गांभीर्याने विचार विनिमय करून राज्यातील सर्व जिल्ह्यातील नोंदणीकृत रोहोयों मजुरांना एक विशेष बाब म्हणून सरसकट प्रत्येकी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत करणारा लोक कल्याणकारी निर्णय द्यावा अशी मागणी भीमशक्ती संघटनेने केली आहे. कोरोना महामारीच्या काळात मजूर आर्थिक विवंचनेत आहे.
अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर भूमिहीन, कामगारांना दररोज मोलमजुरीचे काम केल्याशिवाय त्यांची सकाळ संध्याकाळची चूल पेटत नाही. परंतु कोरोना काळात त्यांना कोणतेच काम उपलब्ध होत नसल्यामुळे हातावर आणून पानावर खाण्याची एवढेच नव्हे तर प्रसंगी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासन प्रशासनाने वेळीच दखल घेऊन पवनी, लाखनी, तुमसर, मोहाडी, लाखांदूर, साकोली,भंडारा तालुक्यासह अन्य गावातील अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन कामगारांना एक विशेष बाब म्हणून सरसकट पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देणारा लोक कल्याणकारी धोरणात्मक निर्णय घेऊन तमाम नागरिकांना दिलासा देण्याची तसदी घ्यावी अशी मागणी भीमशक्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश देशपांडे, मनोज मेश्राम, एस. के. वैद्य, बाळकृष्ण शेंडे, भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, हरिदास बोरकर, हर्षवर्धन हुंमने, अरुण ठवरे,उमाकांत काणेकर, विनाश खोब्रागडे, नितीश काणेकर, मच्छिंद्र टेंभूर्णे, संदीप बर्वे, सुरेश गेडाम, सुभाष शेंडे, सुधाकर चव्हाण, दामोधर उके, नत्थू सूर्यवंशी, नंदू वाघमारे, तोताराम दहीवले, महादेव देशपांडे, जयपाल रामटेके, अरुणा दामले, पपीता वंजारी, रूपा लेंधारे, शुभांगी भूतांगे, संयोगिता खोब्रागडे, ज्योती मेश्राम, पुष्पा मुल, कल्पना वानखेडे, शारदा रंगारी, विभा रामटेके, माधुरी सुखदेवें, संघमित्रा गेडाम प्रमिला बोरकर, शर्मिला बोरकर, सरिता टेंभूर्णे, विद्या धारगावे, वर्षा शेंडे, साधना मेश्राम, अनु गेडाम, साधना गोडबोले, तरासन डोंगरे, पंचशील मेश्राम, रमा धारगावे, कलावती भोवते, विद्या उंदीरवाडे, अर्चना उंदीरवाडे, वनमाला बोरकर, मनीषा मेश्राम, विशाखा बनसोड, मंदा मेश्राम, सुमन वंजारी, प्रमिला बोरकर यांनी केली आहे