शिक्षकेत्तरांना आॅनलाईनच्या कामाचे प्रशिक्षण द्यावे

By admin | Published: January 28, 2017 12:41 AM2017-01-28T00:41:45+5:302017-01-28T00:41:45+5:30

शिक्षकांसह शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या प्रमाणात आॅनलाईन कामांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Provide training to teachers online | शिक्षकेत्तरांना आॅनलाईनच्या कामाचे प्रशिक्षण द्यावे

शिक्षकेत्तरांना आॅनलाईनच्या कामाचे प्रशिक्षण द्यावे

Next

शिक्षणाधिकारी यांना निवेदन : शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाची मागणी
भंडारा : शिक्षकांसह शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या प्रमाणात आॅनलाईन कामांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र अनेक कर्मचाऱ्यांना त्याची अद्ययावत माहिती नाही. त्यामुळे शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आॅनलाईन कामाचे प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी भंडारा जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाने केली आहे.
शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून हि मागणी केली आहे. यासंघाची त्रैमासिक सहविचार सभा शनिवारला शिक्षणाधिकारी यांच्या दालनात पार पडली. यात ही मागणी करण्यात आली. यासोबतच मुंबई उच्च न्यायालय रिट याचीका क्रमांक ३७९४ ला दिलेले इंटेरियम आदेशानुसार जीपीएफ खाते पुर्ववत चालु करावे, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मासिक वेतन वेळेवर होण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासन अधिकाऱ्याला सभेत उपस्थित राहण्याच्या सुचना कराव्या, शिक्षकेत्तरांना आॅनलाईनच्या कामासाठी प्रशिक्षण द्यावे, प्लानमधील शाळा नॉन प्लानमध्ये समाविष्ट कराव्या, अनुकंपा तत्वावरील कर्मचाऱ्यांना सेवेत समायोजन करावे, कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत निर्णय घ्यावा, बिआरसी भंडारा येथे सादर केलेल्या माहितीची साक्षांकित प्रत देण्यात यावी, एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प अधिकारी यांच्या विभागाद्वारे आॅनलाईन शिष्यवृत्तीचे फार्म व समस्यांवर विचार करुन समस्या निकाली काढाव्या यासह अन्य समस्यांबाबद चर्चा करण्यात आली.
या सभेला जिल्हाध्यक्ष सैनपाल वासनिक, राजेश तितीरमारे, संजय ब्राम्हणकर, रुषीकेश डोंगरे, गंगाधर भदाडे, भाष्कर मेश्राम, संदीप सेलोकर, संजय मोहतुरे, गिता सराटे, अशोक शंभरकर, रतन वंजारी, बबन निखारे, बाबुराव मांढरे, यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Provide training to teachers online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.