जनजागृतीच आपत्ती व्यवस्थापनाचा मूलमंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 10:45 PM2017-10-09T22:45:01+5:302017-10-09T22:45:16+5:30

आपत्ती विविध प्रकारची असून दुष्काळ, पूरपरिस्थिती, रस्ते अपघात व आग अशा स्वरुपाच्या आपत्ती या आपल्याकडे महत्वाच्या आपत्ती असून एखाद्या गोष्टीची माहिती असणे हे सुद्धा आपत्ती व्यवस्थापन आहे.

Public awareness about the mismanagement of disaster management | जनजागृतीच आपत्ती व्यवस्थापनाचा मूलमंत्र

जनजागृतीच आपत्ती व्यवस्थापनाचा मूलमंत्र

googlenewsNext
ठळक मुद्देआपत्ती व्यवस्थापन सप्ताह साजरा करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आपत्ती विविध प्रकारची असून दुष्काळ, पूरपरिस्थिती, रस्ते अपघात व आग अशा स्वरुपाच्या आपत्ती या आपल्याकडे महत्वाच्या आपत्ती असून एखाद्या गोष्टीची माहिती असणे हे सुद्धा आपत्ती व्यवस्थापन आहे. खºया अर्थाने जनजागृतीच आपत्ती व्यवस्थापनाचा मूलमंत्र असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी व्यक्त केले.
९ आॅक्टोबर ते १३ आॅक्टोबर दरम्यान आपत्ती व्यवस्थापन सप्ताह साजरा करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. आपत्ती व्यवस्थापन सप्ताहाचा जिल्हाधिकारी कार्यालय येथे औपचारिकरित्या शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आपत्ती व्यवस्थापन सप्ताह निमित्त ९ आॅक्टोबर ते १३ आॅक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत. आपत्ती व्यवस्थापनाची माहिती देणाºया कलापथकाने आज या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, आपत्ती ही सांगून येणारी घटना नसून त्यासाठी सदासर्वदा सजग असणे महत्वाचे आहे. आपल्याकडे साधारणत: रस्ते अपघात, दुष्काळ, पूरपरिस्थिती, आग, आजाराची साथ, चेंगराचेंगरी अशा प्रकारच्या आपत्ती घडतात. आपत्ती व्यवस्थापनाचा मूलमंत्र म्हणजे नागरिकात जागृती करणे होय. यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचाºयांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने १५५ शाळांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्हास्तरीय अधिकाºयांना सुद्धा प्रशिक्षण देण्यासाठी कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाºयांनी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेऊन इतरांना प्रशिक्षित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. आपत्ती व्यवस्थापन सप्ताहात पथनाट्य, वादविवाद स्पर्धा, वर्क्तृत्व स्पर्धा आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. आपण एखाद्या जीव जरी वाचवू शकलो तरी आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य आपल्या हातून घडेल असे जिल्हाधिकारी म्हणाले. येणारा काळ हा आपत्ती व्यवस्थापनाचा काळ असून दुष्काळ, पूर व रस्ते अपघात या आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रत्येकाने प्रशिक्षित व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Public awareness about the mismanagement of disaster management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.