अड्याळ येथे पशुपक्षी प्रदर्शनातून जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 09:25 PM2019-02-15T21:25:44+5:302019-02-15T21:26:03+5:30
पवनी पंचायत समिती व जिल्हा परिषद भंडाराच्या पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारला अड्याळ येथे पवनी तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील शेतकरी व पशुपक्षी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : पवनी पंचायत समिती व जिल्हा परिषद भंडाराच्या पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारला अड्याळ येथे पवनी तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील शेतकरी व पशुपक्षी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन पवनी पंचायत समितीचे सभापती धनराज ढेंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपसभापती मधु गभणे होते., प्रमुख अतिथी म्हणून खासदार मधुकर कुकडे, विभागीय सहआयुक्त डॉ. किशोर कुंभरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नितीन फुके, गटविकास अधिकारी अनिता तेलंग, पवनीचे कृषी अधिकारी संजय लांजेवार, डी.के. बारापात्रे, डॉ. एल. के. बारापात्रे, डॉ. आर. आय. हातझाडे, डॉ. आर. जे. यमपुरे, ग्रामपचांयत अड्याळ येथील सदस्य तथा ग्रामविकास अधिकारी, तोमेश्वर पंचभाई, अर्चना वैद्य, मंगला रामटेके, कल्पना गभणे आदी उपस्थित होते.
पशुपक्षी प्रदर्शनामध्ये एकुण ४४३ पशुपक्षी आणण्यात आले. यात विविध जातींचा समावेश होता. यावेळी पाहायला ग्रामस्थांना मिळाले. यामधून उत्कृष्ठ पशुधनाची पाहणी करण्यात येवुन ३० शेतकऱ्यांचा व पशुपक्षी पालन करणाºयांचा यावेळी बक्षीस देऊन गुणगौरव करण्यात आला. पशुपालक व शेती एकमेकांना पुरक आहेत. पशुपालकांशिवाय शेतजमिनीची सुपिकता टिकविता येत नाही. रासायनिक खतांनी शेतजमीनी नापिक होत चालल्या आहेत. जरी उत्पादन वाढला असला तरी दर्जा मात्र घसरल्यामुळे आज खाद्यपदार्थालाही पुर्वीसारखी चव राहिली नसल्याचे मत यावेळी मंचकावरुन अनेकांनी मांडले. कृषी प्रदर्शनीमध्ये कंपोष्ट खत, शेणखताचे वाटप करुन शेतात पिकविलेले पालेभाज्या व अन्नधान्य अनेक शेतकºयांनी आणले होते. आधुनिक तंत्रज्ञान व कृषीक्षेत्रातील नवे विचार शेतकºयांना पटवून देण्यात आले.
यावेळी विविध प्रकारचे स्टाल लावण्यात आले होते. येथे शेतकरी व गोपालाकांनी भेटी देऊन साहित्यांची माहिती जाणून घेतली. प्रास्ताविक डॉ. आर. जे. यमपुरे यांनी केले. संचालन डॉ. प्रमोद सपाटे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. रवी हातझाडे यांनी केले. तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनात आलेले शेकडो शेतकरी बांधवांना अड्याळग्रामस्थांनी अल्पोहार तथा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. तसेच गोधणाच्या चाºयाची, पाण्याची व्यवस्था केली असल्यामुळे शेतकरी बांधव आनंदीत होते. कार्यक्रमासाठी अड्याळ ग्रामस्थ तथा विभाग पदाधिकारी तथा कर्मचारी वर्गाने परिश्रम केले.