साकोलीतून ‘व्हीव्हीपॅट’ची जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 09:59 PM2019-01-04T21:59:45+5:302019-01-04T22:00:08+5:30
तालुक्यातील प्रत्येक गावात आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूका २०१९ च्या अनुषंगाने जनतेला ई.व्ही.एम. व व्ही.व्ही. पॅट बद्दल माहिती होणेसाठी व जनजागृती करणेसाठी ३ जानेवारी रोजी तालुक्यातील मौजा खंडाळा येथील ग्रामपंचायत कार्यालयात जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : तालुक्यातील प्रत्येक गावात आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूका २०१९ च्या अनुषंगाने जनतेला ई.व्ही.एम. व व्ही.व्ही. पॅट बद्दल माहिती होणेसाठी व जनजागृती करणेसाठी ३ जानेवारी रोजी तालुक्यातील मौजा खंडाळा येथील ग्रामपंचायत कार्यालयात जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी शंतनू गोयल यांनी भेट देऊन कार्यक्रमस्थळी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. तसेच जिल्हाधिकारी यांचे प्रमुख उपस्थित नरेंद्र गायधने मुख्याध्यापक जि.प. वळद यांनी उपस्थित जनतेला ईव्हीएम, व्ही.व्ही.पॅट व बॅलेट युनिटबाबत माहिती प्रात्याक्षीक करुन दिली. तसेच यावेळी निवडणुकीबाबत अभिरुप मतदान सुध्दा उपस्थित नागरीक यांनी करुन बघीतले.
मतदान केल्यानंतर ७ सेकंदासाठी आपण या यंत्रावर आपण केलेल्या मतदानाची स्लीप दिसते व नंतर आपोआप ती स्लीप सीलबंद डब्यात पडते.
याबाबत विस्तुत माहिती तहसील जनजागृती पथकातील पथक प्रमुख वाय. आर. चौधरी मंडळ अधिकारी सानगडी व दिनेश सिडाम तलाठी कुंभली, एल. एम. नान्हे ग्रामसेवक बोडे यांनी दिली. यावेळी खंडाळा गावाचे सरपंच देवेंद्र लांजेवार सह गावातील बहुसंख्य नागरीक कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता जिल्हाधिकारी यांचे समोर अभिरुप मतदानाची मतमोजणी प्रथम ईव्हीएम डिस्प्ले वर व नंतर व्ही. व्ही. पॅट मधील चिठ््याची मतमोजणी करुन झाली एकूण ४० नागरिकांनी मतदान केले होते. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत शिपाई व भानु खोब्रागडे मतदान केले होते. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत शिपाई व भानु खोब्रागडे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाबाबत जागृत नागरिकांनी समाधान व्यक्त केले.