ग्रामविकासाकरिता जनतेचे सहकार्य महत्त्वाचे

By admin | Published: September 19, 2015 12:43 AM2015-09-19T00:43:45+5:302015-09-19T00:43:45+5:30

गावाच्या सर्वांगिण विकासासाठी गावकऱ्यांचा सहभाग आवश्यक असतो.

Public cooperation is important for rural development | ग्रामविकासाकरिता जनतेचे सहकार्य महत्त्वाचे

ग्रामविकासाकरिता जनतेचे सहकार्य महत्त्वाचे

Next

राजेगाव येथे भवनाचे उद्घाटन : आकाश कोरे यांचे प्रतिपादन
लाखनी : गावाच्या सर्वांगिण विकासासाठी गावकऱ्यांचा सहभाग आवश्यक असतो. शासनाच्या कितीही योजना तयार केल्या तरी व्यापक अंमल बजवणीसाठी ग्रामपंचायतला गावकऱ्यांनी सहकार्य करणे गरजे आहे. ग्रामस्वच्छता आवश्यक असून रोगराईचा नायनाट करण्यासाठी स्वच्छता महत्त्वाची असल्याचे विचार जि.प. सदस्य आकाश कोरे यांनी केले.
तालुक्यातील राजेगाव, मोरगाव येथे ग्रामपंचयतच्या नवीन इमारतीचे उद्घाटन समारंभ पार पडला. राजीव गांधी पंचायत राज अक्षमीकरण योजनेतून १२ लक्ष रूपयांचा निधी खर्च करून राजेगाव येथे ग्रामपंचायत भवन तयार करण्यात आले. सदर योजनेतून भंडारा जिल्ह्यात पहिले भवन पूर्णत्वास आले.
उद्घाटक म्हणून पंचायत समिती सभापती रजनी आत्राम उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य ज्ञानेश्वर रहांगडाले उपस्थित होते. अतिथी म्हणून जि.प. सदस्य आकाश कोरे, खंडविकास अधिकारी हेमंत मेहर, अभियंता धनंजय बागडे, पं.स. सदस्य सरिता कानतोडे, सरपंच नाजुक भैसारे, सुनिल बांते, अंकोश कानतोडे, नूतन ठाकरे, अशोक चेटुले, सरपंच धनंजय ठाकरे, उपसरपंच सुजाता गणवीर, भाष्कर नागदेवे, आरती पारधीकर, अनिता टेकाम, वनिता वरकडे, पोलीस पाटील आनंदराव बघेले, नरेंद्र रामटेके, किसन मरसकोले आदी उपस्थित होते.
याप्रसंगी रजनी आत्राम यांच्या हस्ते ग्रामपंचायत भवनाचे फित कापून लोकार्पण करण्यात आले. मार्गदर्शनपर भाषणात आत्राम यांनी स्वच्छतेचा संकल्प जोपासण्याचे आवाहन केले. मेहर यांनी सदृढ आरोग्यासाठी स्वच्छ पाण्याचे महत्व सांगितले. सद्यस्थिती भाषणात रहांगडाले यांनी गावाच्या विकासासाठी विविध योजना राबवून जनतेचे कल्याण करावे व जनतेने शासकीय उपक्रमात सहभागी होवून आर्थिक विकास करावा, असे आवाहन केले. प्रास्ताविक बाबा ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन धनपाल बोपचे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Public cooperation is important for rural development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.