तुमसर बाजार समितीवर जनहित आघाडीचे वर्चस्व

By admin | Published: August 23, 2016 01:05 AM2016-08-23T01:05:23+5:302016-08-23T01:05:23+5:30

जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या तुमसर - मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समिती

Public Harmony Committee on Tasar Bazar Samiti | तुमसर बाजार समितीवर जनहित आघाडीचे वर्चस्व

तुमसर बाजार समितीवर जनहित आघाडीचे वर्चस्व

Next

तुमसर : जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या तुमसर - मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा निकाल सोमवारी घोषित झाला. यात बळीराजा जनहित आघाडीचे १५ उमेदवार विजयी झाले. शेतकरी आघाडी ४, अपक्ष १ तर स्वाभिमान शेतकरी आघाडीला खाते उघडता आले नाही. भाऊराव तुमसरे व अरविंद कारेमोरे यांच्या नेतृत्वात बळीराजा जनहित आघाडीने बाजी मारली.
तुमसर- मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची रविवारला पार पडली. आज सोमवारला सकाळी ९ वाजता मतमोजणीला सुरवात झाली. सेवा सहकारी गटातून सर्वसाधारण बळीराजा जनहित आघाडीचे भाऊराव तुमसरे ६९८, हरेंद्र रहांगडाले ५४४, सुनिल गिरीपुंजे ५५२, डॉ. अशोक पटले ५१३, महादेव पचघरे ४५९, राजेश पटले ५७५, कुसूम कांबळे (महिला राखीव) ६३७, चंद्रकला ढेंगे ५०९, व्यापारी अडते गटातून अरविंद कारेमोर ३३७, अनिल जिभकाटे ३३६, पणन प्रक्रीया सुभाष बोरकर ४३, ग्राम पंचायत गट हरिधर गोंडाणे ५४४ (अनुसूचित जाती/जमाती), विमुक्त भटक्या जाती-जमाती गणेशराम बावणे ५५८, ग्राम पंचायत दुर्बल गटातून बालकदास ठवकर ४६७, तोलारी/हमाल गटातून चंद्रशेखर सेलोकर १२३ (अपक्ष), शेतकरी आघाडीचे रामदयाल पारधी ५६७, किरण अतरकी ४७७ (सेवा सहकारी गट) रामेश्वर कारेमोरे (ग्रामपंचायत) ५६६ यांचा समावेश आहे.
ग्रामपंचायत सर्वसाधारण गटात बळीराजा जनहित आघाडीचे सहादेव ढबाले व सतिश चौधरी यांना ५२९ अशी समसमान मते पडली होती. त्यामुळे त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पुनरमोजणीची मागणी केली होती. पुनरमोजणीनंतर चौधरी यांना ५२८ तर ढबाले यांना ५२६ मते मिळाल्याने चौधरी यांना विजयी घोषित करण्यात आले. आज झालेल्या मतमोजणीत ५ संचालक पुन्हा निवडून आले. उपसभापती राजकुमार माटे यांचा निसटता पराभव झाला. तब्बल सात वर्षानंतर बाजार समितीची निवडणूक झाली. विद्यमान सभापती भाऊराव तुमसरे यांनी सर्वात जास्त मते घेऊन वर्चस्व प्रस्थापित केले. येथे बळीराजा जनहित आघाडीला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले. भाऊराव तुमसरे यांची सभापतीपदी पुन्हा विराजमान होण्याची शक्यता आहे.
विजयी उमेदवारांनी शहरातून त्यांच्या समर्थकांनी ढोल-ताशांच्या गजरात मुख्य मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हरिहर कुहीकर, सहायक अधिकारी पी. डब्ल्यू. भानारकर, अमित सुर्यवंशी यांनी काम पाहिले. पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Public Harmony Committee on Tasar Bazar Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.