जनतेचा स्वयंस्फूर्तीने लाॅकडाऊनला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:32 AM2021-04-14T04:32:41+5:302021-04-14T04:32:41+5:30
पालांदूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व बीट अंतर्गत नाकाबंदी करण्यात आली आहे. चौका-चौकात पोलिसांची देखरेख असून नाहक फिरणाऱ्याला समज ...
पालांदूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व बीट अंतर्गत नाकाबंदी करण्यात आली आहे. चौका-चौकात पोलिसांची देखरेख असून नाहक फिरणाऱ्याला समज देण्यात येत आहे. केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू असून बाकी सर्व बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. सोमवारपासून शासन नव्याने पुरविणाऱ्या मार्गदर्शक सूचनेनुसार बाजारपेठेचा चालू-बंदचा निर्णय घेण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक मनोज सिडाम पालांदूर यांनी सांगितले. तरुणाई मात्र रस्त्यावर फिरताना दिसत आहे. कोणतेही काम नसताना नाहक चौकात किंवा आडोशाला उभे राहून गर्दी वाढवण्याचा प्रयत्न तरुणाई करीत आहे. तरुणांनी अशा कठीण प्रसंगात प्रशासनाला सहकार्य करणे अपेक्षित आहे.
बॉक्स
दररोजची कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक
गत काही दिवसापासून ताप, सर्दी, खोकला यांचे रुग्ण वाढत आहेत. हेच रुग्ण कोरोनाचे प्रमाण वाढवीत आहेत. साधा ताप जरी कुटुंबात आला तरी संपूर्ण कुुंटुंबात भीती निर्माण होते. स्थानिक दवाखाने रुग्णांनी भरलेले दिसत आहेत. कोरोना संसर्गजन्य आजाराचे भय दिवसेंदिवस वाढत आहे.