जलयुक्त शिवारामुळे स्रोताला फुटतोय पाझर
By admin | Published: March 26, 2016 12:32 AM2016-03-26T00:32:59+5:302016-03-26T00:32:59+5:30
जिवती तालुक्याला दरवर्षीच पाणी टंचाईची झळ सोसावी लागते. अनियमित पावसामुळे तसेच तसेच अल्पवृष्टीमुळे येथील जनजीवन उन्हाळ्याच्या दिवसांत प्रभावित होते.
जनावरांना पाण्याची सोय : पिकांनाही मिळणार पाण्यामुळे जीवदान, शेतकरी सुखावले
शंकर चव्हाण/संघरक्षित तावाडे जिवती
जिवती तालुक्याला दरवर्षीच पाणी टंचाईची झळ सोसावी लागते. अनियमित पावसामुळे तसेच तसेच अल्पवृष्टीमुळे येथील जनजीवन उन्हाळ्याच्या दिवसांत प्रभावित होते. एवढेच नाही तर जनावरांनाही याचा फटका सहन करावा लागतो. मात्र यावर्षी या तालुक्याचे चित्र काही अंशी पालटले आहे. शासनाच्या जलशिवार योजनेमुळे या परिस्थितीवर मात करण्यास मदत होणार आहे.
जिवती तालुक्यात शासनाची जलशिवार योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली आहे. गेल्या एक-दोन वर्षांत शासनाचे हे काम सुरळीत सुरू आहे. या योजनेंतर्गत शेत तलाव, वनतलाव, सिमेंट बंधारे याद्वारे या योजनेंतर्गत शेत तलाव, वनतलाव, सिमेंट बंधारे याद्वारे पाण्याचा साठा कसा होईल आणि शेती वा जनावरांच्या उपयोगी तो पाणी साठा कसा उपयोगी येईल, यासाठी प्रयत्न केले जात आहे. आजच्या स्थितीत जिवती तालुक्यात जलशिवाराची कामे समाधानकारक आहेत. बंधारा असो की तलाव यामध्ये थोड्याप्रमाणात पाणी साचून आहे. हे पाणी जरी शेतीला कामात येत नसले तरी पाळीव तसेच जंगली प्राण्यांची तहाण भागवित आहे. जलशिवार योजनेनंतर परिसरातील नैसर्गिक झऱ्यांनाही पाझर फुटल्याचे दिसत आहे.
ही योजना राबविण्यात वनविभाग, कृषी विभाग, जलसंधारण विभाग यांनी मोलाचा पुढाकार घेतला आहे.
जीवती तालुक्यातील नागरिकांना दरवर्षीच पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाच्या जलशिवार योजनेचा या तालुक्याला फायदा मिळावा या हेतूने तत्कालिन कृषी अधिकारी राज वानखेडे यांनी ही योजना भक्कमपणे राबविली.
जलशिवार योजनेंतर्गत करण्यात आलेली कामे
शासनाच्या जलशिवार योजनेंतर्गत शेत तळे, वन तळे, सिमेंट बंधारे, ढाळीचे बंधारे, नाल्यातील उपसा काढून दगडाने पाणी अडविणे यासारखी कामे करण्यात आलीत. दगडाने बंधारा बांधून त्यावर जाळी पसरविणे, याला जाळीचे बंधारे म्हणतात. ही कामे जिवती तालुक्यात कृषी विभाग, वनविभाग आणि जलसंधारण विभागाने केलीत.
योजनेतून लोकांना मिळाला रोजगार
जलशिवार योजनेअंतर्गत तलावाची, बंधाऱ्याची विहिरीची जी कामे झालीत, त्यामुळे तालुक्यातील नागरिकांच्या हाताला रोजगार मिळाला. एकीकडे या योजनेमार्फत पाण्याचा साठा वाढविता आला तर दुसरीकडे मजुरांना रोजंदारी मिळाली, हे विशेष.