आदिवासी मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:36 AM2019-04-24T00:36:18+5:302019-04-24T00:36:50+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील इन्फ्रंट जिजस पब्लिक स्कूल मधील अल्पवयीन आदिवासी मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपींची सीबीआय चौकशी करून आरोपींना फाशी देण्याची मागणी एका निवेदनातून आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील इन्फ्रंट जिजस पब्लिक स्कूल मधील अल्पवयीन आदिवासी मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपींची सीबीआय चौकशी करून आरोपींना फाशी देण्याची मागणी एका निवेदनातून आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
राजुरा येथील इन्फ्रंट जिजस स्कूलमध्ये तिसरी व पाचव्या वर्गात शिकणाºया आदिवासी मुलींवर अत्याचार करण्यात आले. या प्रकरणात छगन पचारे याला अटक करण्यात आली. सदर शाळेत अनेक वर्षांपासून आदिवासी मुलींवर अत्याचार होत आहे. हे संपूर्ण प्रकरण राजकीय दबावात रितसर दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सीबीआयकडे चौकशी देण्यात यावी, या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा या निवेदनातून देण्यात आला. निवेदन देताना गोवर्धन कुंभरे, गणपतराव कडापे, अजाबराव चिचामे, अशोक उईके, धनलाल तिलगामे, ज्ञानेश्वर मडावी आदी उपस्थित होते.
आंदोलनाचा इशारा
आदिवासी मुलींवरील अत्याचार प्रकरणी योग्य कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशारा आदिवासी एम्प्लॉईज फेडरशेनच्या वतीने देण्यात आला आहे.