जिल्ह्यात चार लाख १६ हजार क्विंटल धान खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 10:13 PM2018-12-01T22:13:39+5:302018-12-01T22:14:02+5:30
आधारभूत किंमत धान खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ६७ केंद्रांवर ३० नोव्हेंबरपर्यंत ४ लाख १६ हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. १३ हजार ७७८ शेतकऱ्यांनी धान विकला असून या धानाची किंमत ७२ कोटी ८९ लाख २३ हजार ८१५ रुपये आहे. त्यापैकी सुमारे ४७ कोटी रुपये शेतकºयांच्या खात्यात वळते करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आधारभूत किंमत धान खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ६७ केंद्रांवर ३० नोव्हेंबरपर्यंत ४ लाख १६ हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. १३ हजार ७७८ शेतकऱ्यांनी धान विकला असून या धानाची किंमत ७२ कोटी ८९ लाख २३ हजार ८१५ रुपये आहे. त्यापैकी सुमारे ४७ कोटी रुपये शेतकºयांच्या खात्यात वळते करण्यात आले आहे. गतवर्षी ३० नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात २ लाख ४६ हजार धानाची खरेदी झाली होती. यंदा याच कालावधीत दुप्पट खरेदी झाली आहे. दुष्काळाशी सामना करीत शेतकºयांनी पिकविलेला धान विकण्यासाठी आधारभूत केंद्रावर मात्र शेतकºयांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.
भंडारा जिल्ह्यात अपुºया पावसाने यावर्षी धानपीक धोक्यात आले होते. त्यानंतरही शेतकºयांनी सिंचन करून धान पिकविला. जिल्ह्यात ६७ केंद्रावर आधारभूत किमतीत धान खरेदी केला जात आहे. जिल्ह्यातील सर्व केंद्रावर शेतकरी केवळ साधारण प्रतीचाच धान आणत असल्याचे दिसून येते. ३० नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात ४ लाख १६ हजार ५२७ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. यात भंडारा तालुक्यात ९ हजार ५५७ क्विंटल, मोहाडी ४० हजार १०८ क्विंटल, तुमसर ८८ हजार ९२१ क्विंटल, लाखनी ७९ हजार ३८७ क्विंटल, साकोली ८४ हजार ९५ क्विंटल, लाखांदूर ८७ हजार ८८२ क्विंटल, पवनी २६ हजार ५७५ क्विंटल धानाचा समावेश आहे. या सर्व धानाची किंमत ७२ कोटी ८९ लाख २३ हजार ८२५ रुपये आहे. त्यापैकी ४७ कोटी रुपये शेतकºयांच्या खात्यात वळते करण्यात आले आहे. तर सुमारे २५ कोटी रुपये लवकरच शेतकºयांच्या खात्यात वळते केले जातील.
भंडारा जिल्ह्यात पणन महासंघाचे ६७ केंद्र मंजूर झाले असून सर्वच केंद्रावर प्रत्यक्ष खरेदी सुरु आहे. त्यात भंडारा ३, मोहाडी ९, तुमसर १५, लाखनी ११, साकोली १२, लाखांदूर १२ आणि पवनी येथील पाच केंद्रांचा समावेश आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी धानाची दुप्पट खरेदी झाली असून वेळेवर पैसे मिळत असल्याचे पणन महासंघाच्या वतीने सांगितले जात आहे .मात्र धान खरेदी केंद्रावर शेतकºयांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. बारदाना आणि गोदामाचा प्रश्न कायम आहे.
धान साठविण्याची समस्या
आधारभूत केंद्रावर खरेदी झालेला धान साठविण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. तालुक्याच्या ठिकाणी गोदाम अपुरे पडत आहेत. त्याचा परिणाम खरेदीवर होत असल्याचे दिसून येते. अनेक केंद्रावर शेतकरी १५ ते २० दिवसांपासून धान खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक शेतकºयांचा धान उघड्यावर आहे. त्यातच आता बारदाण्याचीही समस्या निर्माण झाली आहे. जुना बारदाना केंद्रावर पोहचल्याने त्यातील अर्धेअधिक पोते फाटके निघत असल्याच्या तक्रारी आहेत.
आधारभूत धान केंद्रावर यंदा गतवर्षीपेक्षा दुप्पट खरेदी झाली आहे. खरेदीची रक्कम शेतकºयांच्या खात्यात वळती केली जात असून आतापर्यंत ४७ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.
-गणेश खर्चे, जिल्हा पणन अधिकारी, भंडारा.