मुरमाडीत धान खरेदी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 09:06 PM2019-01-06T21:06:22+5:302019-01-06T21:08:16+5:30
तालुक्यातील मुरमाडी (तुपकर) येथील शासकीय धान खरेदी केंद्राचे गोदाम हाऊसफुल्ल झाल्यामुळे धान खरेदी थांबल्याने शेतकºयांचा धान उघड्यावर पडून आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : तालुक्यातील मुरमाडी (तुपकर) येथील शासकीय धान खरेदी केंद्राचे गोदाम हाऊसफुल्ल झाल्यामुळे धान खरेदी थांबल्याने शेतकºयांचा धान उघड्यावर पडून आहे.
मुरमाडी (तुपकर) येथील धान खरेदी केंद्र आॅक्टोबर २०१८ पासून सुरु करण्यात आले. ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत १७,८४६ क्विंटल धान खरेदी करण्यात आले. धान खरेदी संस्थेकडे एकच गोदाम असल्यामुळे ९,११६ क्विंटल धान गोदामात मोजण्यासाठी पडून आहे.
शेतकºयांची अडवणूक होऊ नये यासाठी संस्थेने २१ हजार ९२७ पोती म्हणजेच ८ हजार ७७० क्विंटल माल उघड्यावर मोजला आहे. यापैकी ७ हजार ७० पोती म्हणजेच २८२८ क्विंटल मालाची उचल झाली आहे. अद्यापही ९ हजार ११६ क्विंटल माल गोदामात तर १४ हजार ८५७ पोती म्हणजेच ५९४२ क्विंटल धान खरेदी संस्थेच्या मैदानात उघड्यावर पडून आहे.
मालाची उचल नियमितपणे होत नसल्यामुळे सध्या संस्थेने धान खरेदी बंद केली आहे. धान भरडाई करणाºयांकडून तांदळाची उचल शासनाकडून नियमितपणे होत नाही. त्यामुळे शासनाचे उचल आदेशाची अंमलबजावणी होत नाही. संस्थेच्या आवारात धान ठेवण्यासाठी जागा नाही. धान खरेदी बंद असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.