धान खरेदी करुन साकारला तांदूळ व्यवसाय

By Admin | Published: February 4, 2015 11:09 PM2015-02-04T23:09:20+5:302015-02-04T23:09:20+5:30

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानअंतर्गत सोनी येथील साईबाबा अपंग पुरुष गटांनी धान खरेदी व्यवसाय सुरु केला. धान भरडणी करुन तांदूळ विक्री केली जात आहे. या आधी या अपंग पुरुष बचत

Purchase of rice rice business | धान खरेदी करुन साकारला तांदूळ व्यवसाय

धान खरेदी करुन साकारला तांदूळ व्यवसाय

googlenewsNext

रामा ढोरे - कऱ्हांडला
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानअंतर्गत सोनी येथील साईबाबा अपंग पुरुष गटांनी धान खरेदी व्यवसाय सुरु केला. धान भरडणी करुन तांदूळ विक्री केली जात आहे. या आधी या अपंग पुरुष बचत गटानी आदिवासी महिला बचत गटाच्या सहकार्याने हेलन किलर अपंग सार्वजनिक वाचनालय स्थापन केले.
पंचायत समितीमधील एन. आर.एल.एम. विभागाचे विस्तार अधिकारी एम. ई. कोमलवार यांच्या मार्गदर्शनातून हे बचत गट लघुउद्योगाच्या माध्यमातून विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. फेब्रुवारी २०१४ मध्ये सहा अपंग सदस्यांनी बचत गटाची स्थापना केली. ५० रुपये याप्रमाणे ३०० रुपये मासीक बचत सुरु केली. ग्रामीण जिवनोन्नती अभियान अंतर्गत सहा महिण्यामध्ये १५००० रुपये फिरता निधी प्राप्त केला. समाजातील व कुटूंबातील अपंग व्यक्तीला जी वागणूक मिळते त्यावर सविस्तर चर्चा करुन अपंगत्वापासुन चांगले राहणीमान कसे उंचावता येईल या बाजूने विचार करुन ५ नोव्हेंबर २०१४ ला हेलन कीलर अपंग सार्वजनिक वाचनालय सुरु करण्यात आले. यामध्ये सुज्ञ लोकांशी जुळती करण्यात आली.
वाचनालयाचे ठिकाणी धान खरेदी करुन त्यापासून तांदूळ तयार करण्याचा व्यवसाय सुरु केला. अपंग असूनही समाजामध्ये मानाचे जीवन जगण्याचा संकल्प अपंगानी केला. विकासाच्या दिशेने उंचभरारी घेण्याचा माणस अपंगामध्ये निर्माण झाला आहे. (वार्ताहर)

Web Title: Purchase of rice rice business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.