जिल्ह्यात दहा लाख क्विंटल धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:44 AM2020-12-30T04:44:38+5:302020-12-30T04:44:38+5:30

भंडारा : पणन महासंघाच्यावतीने आधारभूत केंद्रावर आतापर्यंत १० लाख ७९ हजार ८८४ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली असून या ...

Purchase of ten lakh quintals of paddy in the district | जिल्ह्यात दहा लाख क्विंटल धान खरेदी

जिल्ह्यात दहा लाख क्विंटल धान खरेदी

Next

भंडारा : पणन महासंघाच्यावतीने आधारभूत केंद्रावर आतापर्यंत १० लाख ७९ हजार ८८४ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली असून या धानाची किंमत २०१ काेटी ७२ लाख २३ हजार ४६१ रुपये आहे. यापैकी ११६ काेटी २ लाख ३१ हजार ६६८ रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना अदा करण्यात आले. आता ८५ काेटी ६९ लाख ९१ हजार ७९३ रुपयांचे चुकाने बाकी आहेत. जिल्ह्यातील बहुतांश गाेदाम हाऊसफुल झाले असून धान ठेवायलाही जागा नाही. परिणामी अनेक ठिकाणी धान खरेदी प्रभावित झाली आहे.

जिल्ह्यात १ नाेव्हेंबर पासून आधारभूत खरेदी केंद्रावर धान खरेदीला प्रारंभ झाला. ७८ खरेदी केंद्रांना आतापर्यंत मंजूरी देण्यात आली असून त्यापैकी ७७ ठिकाणी खरेदी सुरु आहे. अवकाळी पाऊस अतिवृष्टी, महापुराचा फटका झेलत शेतकऱ्यांच्या घरी धान आला आहे. आधारभूत खरेदी केंद्रावर हमीभावासह बाेनस मिळत असल्याने शेतकरी आधारभूत केंद्रावरच धान विकत आहे. नाेंदणी करुन धानाची विक्री केली जात आहे. जिल्ह्यातील ७७ केंद्रावर आतापर्यंत १० लाख ७९ हजार ८८४ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. यात भंडारा तालुका ७७ हजार ७९ क्विंटल, माेहाडी १ लाख ६२ हजार २९४ क्विंटल, तुमसर २ लाख ५ हजार ८६२ क्विंटल, लाखनी १ लाख ८० हजार ४३८ क्विंटल, साकाेली १ लाख ५५ हजार ४६७ क्विंटल, लाखांदूर २ लाख ९ हजार २४५ क्विंटल आणि पवनी तालुक्यात ८९ हजार ४९४ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आधारभूत खरेदी केंद्रावर आतापर्यंत केवळ सर्वसाधारण प्रतीचा धान खरेदी करण्यात आला आहे. उच्चप्रतीचा धान अद्यापपर्यंत एकाही शेतकऱ्याने येथे विक्रीसाठी आणला नाही.

शेतकऱ्यांनी आतापर्यंत विकलेल्या धानाची किंमत २०१ काेटी ७२ लाख २३ हजार ४६१ रुपये आहे. ही रक्कम आधारभूत दरानुसार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत ११६ काेटी २ लाख ३१ हजार ६६८ रुपये वळते करण्यात आले आहे. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना धानाच्या पैशाने माेठा आधार दिला आहे. उर्वरित ८५ काेटी ६९ लाख ९१ हजार ७९३ रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वळते केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात सध्या अस्तित्वात असलेले बहुतांश गाेदाम फुल्ल झाले आहे. धान ठेवायलाही जागा नाही. त्यामुळे धान खरेदी प्रभावित झाली आहे. मिल मालकांना तात्काळ भरडाईचे आदेश देवून गाेदाम खाली करावे अशी मागणी शेतकरी करीत आहे.

बाॅक्स

परप्रांतातील धानाला बंदी

महाराष्ट्रात इतर राज्यापेक्षा धानाला बाेनससह अधिक रक्कम मिळते. १८६८ रुपये हमीदर आणि ७०० रुपये बाेनस असे २५६८ रुपये दर मिळत आहे. त्यामुळे मध्यप्रदेश, छत्तीसगढच नव्हे तर बिहार राज्यातून माेठ्या प्रमाणात जिल्ह्यात धान विक्रीसाठी येत हाेता. अनेक व्यापारी कमी किमतीत धान खरेदी करुन महाराष्ट्रातील आधारभूत केंद्रावर शेतकऱ्यांच्या नावाने विकत हाेते. हा प्रकार उघडकीस आला. चार वाहनचालकांवर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने परप्रांतातून धानाला बंदी घालून सर्वसीमा सील केल्या. हा प्रकार शाेधून काढण्यासाठी पथकाचे गठण करण्यात आले आहे. केवळ राज्यातील शेतकऱ्यांचाच धान आधारभूत खरेदी केंद्रावर खरेदी केला जावा, अशा सक्त सुचना देण्यात आल्या.

Web Title: Purchase of ten lakh quintals of paddy in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.