धारगाव उपसा सिंचन योजनेसाठी शेतकऱ्यांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:44 PM2019-02-25T22:44:04+5:302019-02-25T22:44:24+5:30

तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी मिळावे यासाठी धारगाव उपसा सिंचन योजनेला मंजूरी देण्याची मागणी करत सोमवारी धारगाव येथे धरणे देण्यात आले. या योजनेच्या टप्पा एक ला मंजुरी प्रदान करण्यात आल्याची माहिती गोसेखुर्द सिंचन विभागाच्या अधिकाºयांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

For the purpose of Dharaggaon irrigation irrigation project, farmers will be taken | धारगाव उपसा सिंचन योजनेसाठी शेतकऱ्यांचे धरणे

धारगाव उपसा सिंचन योजनेसाठी शेतकऱ्यांचे धरणे

Next
ठळक मुद्देतीव्र आंदोलनाचा इशारा : शासनाकडे प्रस्ताव पाठविल्याची अधिकाऱ्यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी मिळावे यासाठी धारगाव उपसा सिंचन योजनेला मंजूरी देण्याची मागणी करत सोमवारी धारगाव येथे धरणे देण्यात आले. या योजनेच्या टप्पा एक ला मंजुरी प्रदान करण्यात आल्याची माहिती गोसेखुर्द सिंचन विभागाच्या अधिकाºयांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
भंडारा जिल्ह्यात गोसेखुर्द हा विदर्भातील मोठ सिंचन प्रकल्प पुर्णत्वास येत आहे. या प्रकल्पांतर्गत चार उपसा सिंचनयोजना कार्यान्वित झाले आहे. परंतु भंडारा तालुक्यातील धारगाव, आमगाव, शिंगोरी, भिलेवाडा आणि इतर भागात पाणीच पोहोचले नाही. त्यामुळे शेतकºयांना नापिकीचा सामना करावा लागतो. शेतकºयांना सिंचनाची बारमाही सोय व्हावी यासाठी धारगाव उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्याची शेतकºयांची मागणी आहे. यासाठी माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पाठपुरावा केला. परंतु योजना मार्गी लागली नाही. त्यामुळे धारगाव उपसा सिंचन संघर्ष समितीच्या नेतृत्वात सोमवारी धरणे देण्यात आले. या आंदोलनात माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, संजय रेहपाडे, अनिल गायधने, संघर्ष समितीचे अध्यक्ष उमेश सार्वे, उपाध्यक्ष जनराम मस्के, प्रमोद सार्वे, सचिन मस्के, शेखर पंचबुध्दे, नागेश्वर हर्षे, भिमराव मस्के, रमेश गोमासे, भगवान मस्के, वामन बोंडे, प्रभाकर गंथाडे, वामन शेंडे, सुरेश ढोणे, हरिदास शेंडे, शामदेव मस्के, प्रशांत झंझाड, सुरेश मस्के आदी सहभागी झाले होते.
३२०० हेक्टर सिंचन
धारगाव उपसा सिंचन योजनेमुळे ३२०० हेक्टर शेतजमिनीला सिंचनाचा लाभ होणार आहे. त्यासाठी १४३ कोटी ८६ लाख रुपये खर्च अपेक्षीत आहे. याबाबी लक्षात घेऊन योजनेला मंजूरी प्रदान करावी अशा प्रस्ताव व्हीआयडीसी कडून शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती सिंचन उपअभियंता वैद्य यांनी दिली.

Web Title: For the purpose of Dharaggaon irrigation irrigation project, farmers will be taken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.