महिलांच्या स्वबळावरील उद्योगाला प्रोत्साहित करणे उडाणचा उद्देश
By admin | Published: January 15, 2017 12:36 AM2017-01-15T00:36:28+5:302017-01-15T00:36:28+5:30
महिलांमधील सुप्त गुणांना उजाळा मिळावा, त्यांनी तयार केलेल्या वस्तंूना वेगळे व्यासपिठ मिळावे व महिलांच्या स्वबळावरील उद्योगाला प्रोत्साहित करणे ...
आनंद मेळावा : कल्याणी भुरे यांचे प्रतिपादन
तुमसर : महिलांमधील सुप्त गुणांना उजाळा मिळावा, त्यांनी तयार केलेल्या वस्तंूना वेगळे व्यासपिठ मिळावे व महिलांच्या स्वबळावरील उद्योगाला प्रोत्साहित करणे हाच उडानचा उद्देश असल्याचे प्रतिपादन उडानच्या अध्यक्ष कल्याणी भुरे यांनी केले.
संताजी सभागृहात आयोजित आनंद मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले, जिल्हा परिषद सभापती शुभांगी रहांगडाले, कांचन पडोळे, मंजुश्री जैस्वाल, मिरा भट्ट, उषा जावळे आदी उपस्थित होत्या.
यावेळी भुरे यांनी, उडान संस्थेचे महत्व आणि उद्दिष्ट समजावून सांगत या मेळाव्यात बचत गटांनाही प्राधान्य देण्यात आले व या आनंद मेळाव्यात ४५ दुकानांचे स्टॉल लागले. त्यांच्या वस्तू विक्रीत निघाल्या हे विशेष असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन गिता कोंडेवार यांनी केले. तर उपस्थितांचे आभार समिरा ईलाही यांनी मानले.
कार्यक्रमाकरिता रितू पशिने, पमा ठाकूर, विजया चोपकर, माधुरी कुळकर्णी, अल्का देशमुख, उज्वला मेश्राम यांच्यासह अर्बन को आॅफ बॅक व जनकल्याण सहकारी बँक तुमसर यांचे विशेष सहकार्य लाभले. (शहर प्रतिनिधी)