पुराच्या पाण्यामुळे धानपिक सडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 11:38 PM2017-08-17T23:38:30+5:302017-08-17T23:38:54+5:30
मागील आठवड्यात आलेल्या पावसाबरोबर गोसेखुर्दच्या डाव्या कालव्याचे पाणी सतत आठ दिवस धानपिकात साचून राहिल्याने आसगाव, निघवी, रनाळा, सेंद्री, खैरीदिवाण येथील अनेक शेतकºयांच्या शेतात पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
आसगाव (चौ.) : मागील आठवड्यात आलेल्या पावसाबरोबर गोसेखुर्दच्या डाव्या कालव्याचे पाणी सतत आठ दिवस धानपिकात साचून राहिल्याने आसगाव, निघवी, रनाळा, सेंद्री, खैरीदिवाण येथील अनेक शेतकºयांच्या शेतात पाणी अडून राहिल्याने धानपिकांची मोठी हानी झाली. निसर्गाच्या दुष्टचक्रात सापडलेल्या बळीराजावर विविध संकट येत आहेत.
आधीच जिल्ह्यात पावसाची टक्केवारी अत्यल्प असताना अनियोजित धोरणामुळे डाव्या कालव्यातील पाणी शेतात शिरले. परिणामी ऐन हंगामात हातात येणारे धानपिक पुन्हा धोक्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने ते धान पिक सडण्याच्या मार्गावर आहेत. संबंधित शेतकºयांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात येण्याची मागणी चौरास पट्ट्यातील शेतकºयांनी केली आहे.