आरोपीला ठेवले हॉटेलात!

By admin | Published: July 9, 2016 12:37 AM2016-07-09T00:37:12+5:302016-07-09T00:37:12+5:30

जागृती अ‍ॅग्रो फुडस कंपनीच्या संचालिकेला लाखनी पोलिसांनी अटक केली.

Put the accused in the hotel! | आरोपीला ठेवले हॉटेलात!

आरोपीला ठेवले हॉटेलात!

Next

शेतकऱ्यांची फसवणूक : कारधा पोलिसांचा अफलातून प्रकार
भंडारा : जागृती अ‍ॅग्रो फुडस कंपनीच्या संचालिकेला लाखनी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने जामिनावर सोडून कारधा पोलिसांनी न्यायालयाबाहेर ताब्यात घेऊन भंडाऱ्याला आणले. कारधा पोलिसांनी मात्र, आरोपीला पोलीस कोठडीत न ठेवता तिला शहरातील एका हॉटेलमध्ये ठेवले. एवढेच नव्हेतर आरोपीला संरक्षण म्हणून दोन महिला पोलीस शिपाई तैनात ठेवल्याचा अफलातून प्रकार कारधा पोलिसांनी केल्याचा आरोप तक्रारकर्त्यानी केली आहे.
सांगली येथील जागृती फुडस कंपनीने जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना लाखो रूपयांनी फसवणूक केली आहे. फसवणूक झाल्यापासून तक्रारी वाढत आहेत. जागृती अ‍ॅग्रो फुड्स कंपनी सांगलीच्या संचालकांनी जिल्ह्यात शेतकऱ्यांना व बेरोजगारांना शेळीपालनाच्या उद्योगातून दाम दुप्पट देण्याची आमिष दाखवून कोट्यावधी रुपये जमा करून पलायन केले. या प्रकरणाची तक्रार पीडितांनी लाखनी पोलिसांत केली होती. कंपनीचे संचालक राज गायकवाड, जाई गायकवाड, प्रशांत सोनारे, रोडगे या संचालकाविरोधात लाखनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती.
लाखनी पोलिसांनी जाई गायकवाड या संचालिकेला अटक करुन लाखनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने जामिनावर सुटका झाली. कंपनीच्या संचालिकांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याने बेरोजगारांनी कारधा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. लाखनी न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केल्यानंतर कारधा पोलिसांनी लगेच न्यायालयाबाहेर जाई गायकवाड या संचालिकेला अटक करुन भंडाऱ्याला आणण्यात आले.
कारधा पोलिसांनी मात्र आरोपीला पोलीस कोठडीत न ठेवता एका हॉटेलमध्ये दोन महिला पोलिसांच्या संरक्षणात ठेवले. आरोपीला अटक करायची होती. तर पोलीस कोठडीत ठेवायला पाहिजे होते. मात्र कारधा पोलिसांनी असे न करता तिला हॉटेलात का ठेवले? असा तक्रारकर्त्यांचा आरोप आहे. याप्रकरणात आरोपीविरुद्ध भादंवि ४२०, ४६७, ४०७, ३४ कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही. चौकशीसाठी आरोपीला बोलाविण्यात आले असता ती स्वत: हॉटेलमध्ये थांबली असावी. आमचा आरोपीच्या हॉटेलमध्ये थांबण्याशी आमचा संबंध नाही.
- व्ही. एस. रहांगडाले,
ठाणेदार कारधा.

Web Title: Put the accused in the hotel!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.