गृहप्रवेशाच्या दिवशीच तरुणावर काळाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 05:00 AM2020-08-23T05:00:00+5:302020-08-23T05:00:52+5:30

शहरातील मुख्य मार्गावर दुकान थाटले. मोठा भाऊ प्रकाश त्याला मदत करीत होता. याच काळात घराचे कामही झाले. पुढील वर्षी लग्नाचा बेत असल्याने स्थळ पाहणे सुरु झाले होते. घरात राहायला जाण्यापूर्वी पूजा करण्याचे शनिवारी निश्चित झाले. सर्व साहित्य घरी आले. आनंदाचे वातावरण होते. विकासही नियमित वेळेवर उठला. सकाळी चहा - नाश्ता घेतला. पूजेसंदर्भात तयारीवर चर्चा करत असताना छातीत दुखायला लागली. त्याच्या अचानक हृदयविकाराचा झटका आला.

Put black on the young man on the day he enters the house | गृहप्रवेशाच्या दिवशीच तरुणावर काळाचा घाला

गृहप्रवेशाच्या दिवशीच तरुणावर काळाचा घाला

Next
ठळक मुद्देवरठीची घटना । हृदयविकाराने झाला मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : लॉकडाऊनने रखडलेले घराचे बांधकाम कसेबसे पूर्ण केले. काटकसर करून डोक्यावर छत उभारले. पुढील वर्षी लग्न करण्याचा बेतही निश्चित झाला. भावी आयुष्याचे स्वप्न साकार होत होते. अशातच नवीन घरात जाण्याची तयारी सुरु झाली. गृहप्रवेशाच्या पूजेचे साहित्य घरी आले, सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना काळाने घाला घातला. शनिवारी सकाळी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच तरुणाचा हृदयद्रावक मृत्यू झाला.
विकास सखाराम घरडे (३२) रा.नेहरु वॉर्ड वरठी असे मृत तरुणाचे नाव आहे. आपल्या आई व मोठ्या भावासोबत तो वरठीत राहत होता. मनमिळावू स्वभावाने तो सर्वांचा आवडता होता. चेहऱ्यावर सदैव हास्य असायचे.
विकास येथील सनफ्लॅग कंपनीत कामावर होता. लॉकडाऊनमुळे काही दिवसापासून काम बंद होते. त्यामुळे त्याने महिनाभरापूर्वी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरु केला. शहरातील मुख्य मार्गावर दुकान थाटले. मोठा भाऊ प्रकाश त्याला मदत करीत होता. याच काळात घराचे कामही झाले. पुढील वर्षी लग्नाचा बेत असल्याने स्थळ पाहणे सुरु झाले होते. घरात राहायला जाण्यापूर्वी पूजा करण्याचे शनिवारी निश्चित झाले. सर्व साहित्य घरी आले. आनंदाचे वातावरण होते. विकासही नियमित वेळेवर उठला. सकाळी चहा - नाश्ता घेतला. पूजेसंदर्भात तयारीवर चर्चा करत असताना छातीत दुखायला लागली. त्याच्या अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्याच्या मागे आई, भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे.

भावी आयुष्याचे स्वप्न अपुर्ण
दरम्यान सकाळी ९ वाजता छातीत अचानक दुखायला लागले. लघुशंकेसाठी गेला आणि खाली कोसळला. घरच्यांनी तात्काळ उचलून घरात आणले. डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. डॉक्टरांनी तपासताच काळाने झडप घातल्याचे सांगितले. मात्र कुणाचाच विश्वास बसत नव्हता. आॅटोरिक्षा बोलावून भंडारातील एका खासगी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र त्याला दाखल करून घेण्यास काही रुग्णालयांनी नकार दिला. विकास आपल्यात नाही हे मान्य करायला घरचे तयार नव्हते. घराचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर भावी आयुष्याचे स्वप्न उराशी बाळगणाºया विकासची अखेर प्राणज्योत मावळली. वरठीत हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Put black on the young man on the day he enters the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.