पा.वा. मुलींच्या शाळेत स्वातंत्र्य दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:41 AM2021-08-18T04:41:50+5:302021-08-18T04:41:50+5:30
भंडारा : पा. वा. नवीन मुलींच्या शाळेत मुख्याध्यापिका करुणा इन्कने यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ...
भंडारा : पा. वा. नवीन मुलींच्या शाळेत मुख्याध्यापिका करुणा इन्कने यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका वीणा कुर्वे, तसेच पालक प्रामुख्याने उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका करुणा इन्कने यांनी भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण केले, तसेच देशात समता, बंधुता व अबाधित स्वातंत्र्याची बीजे रोवायची असतील तर प्रत्येकाने मी प्रथम भारतीय व अंतिम भारतीय असल्याची भावना जपली पाहिजे, असे मत व्यक्त करून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विशद करताना देशभक्तीपर सुविचार, दिनविशेष, बोधकथा, गीत गायन व शूरवीरांच्या पराक्रमाची भाषणे सादर केली. संचलन प्रेमलाल मलेवार यांनी केले. आभार राणी रहांगडाले यांनी मानले. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षिका अनिता गजभिये, मंगला साटोणे, सुनीता हुकरे, वनिता खोकले, श्यामली नाकाडे, राणू करणाहके, योगिता वंजारी, अंशू कामडी, पुष्पा गायधने, रंजित खंगार, रमेश जांभोरे, विलास खोब्रागडे आदींनी सहकार्य केले.