देव्हाडी उड्डाणपुलावर प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 12:11 AM2019-09-01T00:11:48+5:302019-09-01T00:12:28+5:30
देव्हाडी येथे गत चार वर्षापासून दगडी उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. भरावात राखेचा वापर करण्यात आला. पावसाळ्यात पुलातून राख वाहून गेल्यावर मोठे भगदाड पडले आहे. इतर खड्डेही पडणे सुरुच आहे. याप्रकरणी संबंधित विभागाचे वरिष्ठ स्थापत्य अभियंत्यांना तक्रार करण्यात आली. निरीक्षणादरम्यान ग्रामस्थांचे शिष्टमंडळानी भेट घेऊन चर्चा केली. परंतु केवळ आश्वासन देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : देव्हाडी येथील उड्डाणपुल बांधकामात अनियमितता असून पुलाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. उद्घाटनापूर्वीच पुलावर मोठे भगदाड व खड्डे पडणे सुरुच आहे. त्याविरोधात देव्हाडी येथील नागरिकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना भेटून तक्रार दिली. सदर पुल बांधकामाची नि:ष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
देव्हाडी येथे गत चार वर्षापासून दगडी उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. भरावात राखेचा वापर करण्यात आला. पावसाळ्यात पुलातून राख वाहून गेल्यावर मोठे भगदाड पडले आहे. इतर खड्डेही पडणे सुरुच आहे. याप्रकरणी संबंधित विभागाचे वरिष्ठ स्थापत्य अभियंत्यांना तक्रार करण्यात आली. निरीक्षणादरम्यान ग्रामस्थांचे शिष्टमंडळानी भेट घेऊन चर्चा केली. परंतु केवळ आश्वासन देण्यात आली. प्रत्यक्षात कारवाई शून्य आहे. केवळ थातूरमातूर खड्डे भरण्यात आली आहैेत. भविष्यात येथे मोठ्या अपघाताची शक्यता अधिक आहे.
राष्ट्रीय महामार्ग आल्याने उड्डाणपुलावरून वाहतूक करणे धोक्याचे आहे. राख वाहून गेल्याने सदर पुल आतून पोकळ झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सदर पुलाची चौकश्ी संदर्भात थेट मंत्रालयात तक्रार केली. परंतु त्याची साधी चौकशी झाली नाही. येथे अपघात झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विवभागासोबतच प्रशासनाची राहील असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
जागतिक बँकेच्या मदतीने सुमारे २४ कोटींचा हा महत्वाकांक्षी उड्डाणपुल आहे. पुराव्यानिशी तक्रार व माध्यमांनी येथे ध्यानाकर्षण केल्यानंतरही येथे कारवाई न झाल्याचे एकच कोडेच आहे.
विभागीय आयुक्तांना पुरावे सादर करणारस्थानिक प्रशासनाने गंभीर दखल न घेतल्याने विभागीय आयुक्तांना नागपूर येथे भेटून पुलाची चित्रफित पुरावे म्हणून सादर करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते खुशाल नागपुरे, स्टेशन टोलीचे माजी सरपंच श्याम नागपुरे, श्यामसुंदर नागपुरे, योगेश गभणे, प्रदीप बोंदरे यांनी दिली. प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष आहे.
ग्रामपंचायतीच्या ठरावातून मांडली व्यथा
देव्हाडी ग्रामपंचायतीने सभेत ठराव मंजूर करून शासनाचे लक्ष वेधून घेतले. यात बस थांब्याची समस्या निकाली काढणे, उड्डाणपुल अंडरपासची निर्मिती अरुंद आहे. चारचाकी वाहने येथे जाण्यास अडचण होते. उड्डाणपुलाला एकच जीना देण्यात आला आहे. किमान ये जा करण्याकरिता चार जीन्यांची गरज आहे. अंडरपासमध्ये पावसाळ्यात पाणी जमा होते. ही समस्या तात्काळ दूर करण्याची मागणी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांना केली.