साकाेली कृषी महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:27 AM2021-06-04T04:27:00+5:302021-06-04T04:27:00+5:30

विधानसभेचे माजी अध्यक्ष व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी गत अर्थसंकल्पीय अधिवेशनात भंडारा जिल्ह्यातील साकाेली तालुक्यातील दाेन महत्वपूर्ण कामांसाठी ...

The question of the place of Sakali Agricultural College was solved | साकाेली कृषी महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न सुटला

साकाेली कृषी महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न सुटला

Next

विधानसभेचे माजी अध्यक्ष व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी गत अर्थसंकल्पीय अधिवेशनात भंडारा जिल्ह्यातील साकाेली तालुक्यातील दाेन महत्वपूर्ण कामांसाठी प्रयत्न केला. त्यात साकाेली कृषी महाविद्यालय व उपजिल्हा रुग्णालय येथे अद्यावत १०० खाटांचे शासकीय रुग्णालयाचे बांधकाम. मात्र कृषी महाविद्यालयासाठी नागझीरा मार्गावरील आलेबेदर येथील जागा जवळपास निश्चित झाली हाेती. मात्र, वनविभागाने परवानगी नाकारल्यामुळे आलेबेदर येथील ती जागा रद्द झाली व जागेअभावी या महाविद्यालयाचे काम रखडले. मात्र, प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी जागेच्या शाेधासाठी अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधून त्याच मार्गावरील जमनापूर येथील जागा निश्चित केली असून या जागेसाठी वनविभागाची मंजुरीसुद्धा दिली आहे. त्यामुळे आता या महाविद्यालयाचा जागेचा प्रश्न सुटला असून लवकरच कामाला गती येणार आहे.

याव्यतिरिक्त साकाेली विधानसभा क्षेत्रात काेट्यवधीच्या कामांना मंजुरी मिळाली असून काही कामे सुरू झाली आहेत. त्यात साकाेली येथे वनविभागाच्या जागेवर बगिच्याची निर्मिती, जांभळी व धर्मापुरी येथे बंधारा बांधकाम, बाेदरा, सुकळी, महालगाव व तुडमापूरी येथे तलाव दुरुस्तीचे काम, मुख्यमंत्री ग्रामसडक याेजनेअंतर्गत राष्ट्रीय महामार्ग ते पाथरी, तुडमापूरी, जांभळी रस्ता, उमरी महालगाव रस्ता, राष्ट्रीय महामार्ग ते गडकुंभली लवारी रस्ता, राष्ट्रीय महामार्ग ते माेहघाटा रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे, तसेच मुंडीपार, किटाळी, बरडकिन्ही, गिराेला, बाेंडे रस्ता व गडकुंभली लवारी रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे, सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत साकाेली ते देव्हाडा रस्ता रुंदीकरण, देव्हाडा करडी साकाेली रस्त्याचे लहान पुलाचे बांधकाम करणे, तसेच सेंदुरवाफा उमरी वडद रस्त्याची सुधारणा करणे.

शेतकऱ्यांना अडचणी लक्षात घेता साकाेली तालुक्यातील माैजा पळसगाव, कुंभली, बाम्पेवाडा, सेंदुरवाफा येथे ५०० मेट्रीक टन क्षमतेचे धान्य गाेदामाचे बांधकाम करण्यात येणार असून साकाेली येथे नवीन पंचायत समिती इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. पत्रपरिषदेला शहराध्यक्ष अश्विन नशीने, इंजि. उमेश कठाणे, राजू पालीवाल, संदीप बावनकुळे उपस्थित हाेते.

बाॅक्स

साकाेलीसाठी विशेष पॅकेज

प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटाेले यांनी सुंदर साकाेली तयार व्हावी, यासाठी एका विशेष पॅकेजची तरतूद करू. त्यात साकाेली येथील तलावाचे साैंदर्यीकरणासाठी तीनशे काेटी, आठवडी बाजार, मटण मार्केट, मच्छिमार्केट यासाठी दाेनशे काेटीची मंजुरी मिळून दिली आहे. साकाेली येथील बसस्थानक व विश्रामगृह अत्याधुनिक तयार करण्यात येणार आहे.

Web Title: The question of the place of Sakali Agricultural College was solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.