पोलीस चौकीचा प्रश्न मार्गी लावणार
By Admin | Published: December 21, 2014 10:54 PM2014-12-21T22:54:57+5:302014-12-21T22:54:57+5:30
बपेरा आंतरराज्यीय तथा अन्य सीमा कायमस्वरुपी बंदोबस्तात ठेवण्यासाठी पोलीस चौकी निर्मितीला मंजुरी मिळाली आहे. येत्या महिनाभरात बांधकामाला गती देण्यात येणार आहे,
चुल्हाड (सिहोरा) : बपेरा आंतरराज्यीय तथा अन्य सीमा कायमस्वरुपी बंदोबस्तात ठेवण्यासाठी पोलीस चौकी निर्मितीला मंजुरी मिळाली आहे. येत्या महिनाभरात बांधकामाला गती देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक कैलास कणसे यांनी केले.
भंडारा जिल्हातील पोलीस पाटील तथा तंमुसचे अध्यक्ष यांच्या संयुक्त आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद भोईटे, तुमसरचे पोलीस निरीक्षक गवई, सिहोऱ्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश इंगोले उपस्थित होते.
कणसे म्हणाले, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, शांतता ठेवण्यासाठी आंतरराज्यीय सीमा महत्वपूर्ण आहेत. या सीमा पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहेत. या सिमेवर पक्की इमारत बांधकाम करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. बपेरा आंतरराज्यीय सीमेवर जागेची अडचण होती. ही अडचण निकाली काढण्यात आली आहे. गावात कार्य करताना पोलीस पाटलाची भूमिका महत्वाची आहे. गावात निर्माण होणारे वाद तात्काळ निकाली काढली पाहिजे. या वादाकडे दुर्लक्ष केल्याने विकोपाला जात आहेत. पोलीस पाटील तथा तंमुसच्या अध्यक्षामध्ये समन्वय असण्याची गरज आहे. समोपचाराने वाद निकाली काढण्यासाठी बैठका घेण्याची गरज आहे. यात पक्षतापूर्ण निर्णय घेवू नये. याशिवाय गावात दाखल होणाऱ्या मुसाफिरांची नोंद पोलीस पाटलांना ठेवली पाहिजे. पोलीस ठाण्यात पाटलाच्या बैठका घेवून विचारांची आदानप्रदान करण्यात यावी. गावात पोलीस पाटलांनी सदैव अलर्ट राहण्याची गरज आहे.. यावेळी पोलीस पाटील आणि तंमुसचे अध्यक्षांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कणसे यांनी अडचणी सांगितल्या असता निकाली काढण्याची ग्वाही दिली. (वार्ताहर)