चार्जरपाठोपाठ राही वाघिणीचा मृतदेह आढळला 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 01:28 PM2018-12-31T13:28:27+5:302018-12-31T13:55:54+5:30

उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात आणखी एका वाघिणीचा मृतदेह सोमवारी (31 डिसेंबर) सकाळी आढळून आला. चार्जर वाघाचा मृतदेह आढळला त्याच परिसरात दुसरी वाघिण मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

rahi tigress was found dead in bhandara | चार्जरपाठोपाठ राही वाघिणीचा मृतदेह आढळला 

चार्जरपाठोपाठ राही वाघिणीचा मृतदेह आढळला 

googlenewsNext
ठळक मुद्देउमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात आणखी एका वाघिणीचा मृतदेह सोमवारी (31 डिसेंबर) सकाळी आढळून आला. चार्जर वाघाचा मृतदेह आढळला त्याच परिसरात दुसरी वाघिण मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

भंडारा : उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात आणखी एका वाघिणीचा मृतदेह सोमवारी (31 डिसेंबर) सकाळी आढळून आला. चार्जर वाघाचा मृतदेह आढळला त्याच परिसरात दुसरी वाघीण मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात सोमवारी सकाळी वन्यजीव विभागाचे कर्मचारी गस्तीसाठी गेले होते. त्यांना चिचगाव कंपार्टमेंट क्रमांक 226 मध्ये मादी जातीचा वाघ मृतावस्थेत आढळून आला. वन्यजीव विभागात टी-4 म्हणून नोंद असलेल्या या वाघिणीला राही नावाने ओळखले जात होते. रविवारी चार्जरचा मृतदेह आढळला त्या ठिकाणापासून काही अंतरावर राही मृतावस्थेत दिसून आली. मृतदेहापासून काही अंतरावर एका रानडुक्कर अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत आढळून आले. विशेष म्हणजे राहीचा मृत्यूही रविवारीच झाला असावा असा अंदाज वन्यजीव विभागाने वर्तविला आहे. एकापाठोपाठ दोन वाघांचा मृत्यू झाल्याने वन्यजीव विभागात एकाच खळवळ उडली आहे. आशिया खंडातील प्रसिद्ध जय वाघाचा बछडा चार्जची राही ही आई असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: rahi tigress was found dead in bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ