मुंढरी येथील जुगार अड्डयावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:34 AM2021-05-24T04:34:20+5:302021-05-24T04:34:20+5:30
करडी पोलिसांची कारवाई : तीनजणांविरुद्ध गुन्हा लोकमत न्यूज नेटवर्क करडी (पालोरा) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जिल्हाधिकारी भंडारा यांनी ...
करडी पोलिसांची कारवाई : तीनजणांविरुद्ध गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जिल्हाधिकारी भंडारा यांनी संचारबंदीचा आदेश लागू केला आहे. मुंढरी बुज येथे शनिवारी दुपारच्या सुमारास तोंडावर मास्क न लावता, एकत्र खुल्या जागेत तासपत्तीवर पैशाची बाजी लावून जुगार खेळताना काहीजण सापडले. करडी पोलिसांनी मोठ्या शिताफीने धाड टाकून त्यांच्या ताब्यातून एकूण १,०५० रुपयांचा माल ताब्यात घेतला. पोलीस उपनिरीक्षक ऋषिदास तांडेकर यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जगदीश मोहन मेश्राम (३९), ओमकार सुधाकर सोनवाने (२३), मुन्ना देवराव उके (३७) (तिघेही रा. मुंढरी बु.) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मुंढरी बुज येथे ही कारवाई शनिवारी सायंकाळी ४ वाजताचे दरम्यान करण्यात आली. अधिक तपास करडी पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नीलेश वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ऋषिदास तांडेकर, बीट हवालदार राकेशसिंग सोलंकी, नायब पोलीस शिपाई नेपाल गभणे, मालाधरे करत आहेत.