रेल्वे रॅक पॉर्इंटअभावी माल वाहतुकीत अडसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 10:27 PM2018-09-03T22:27:19+5:302018-09-03T22:27:42+5:30
मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर असलेल्या भंडारा येथे रॅक पॉर्इंट नसल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना वाहतुकीसाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. भंडारा येथे रॅक पॉर्इंट द्यावा, या मागणीसाठी गत अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे. रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. परंतु अद्यापपर्यंत याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर असलेल्या भंडारा येथे रॅक पॉर्इंट नसल्याने शेतकºयांसह व्यापाºयांना वाहतुकीसाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. भंडारा येथे रॅक पॉर्इंट द्यावा, या मागणीसाठी गत अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे. रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. परंतु अद्यापपर्यंत याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे.
भंडारा शहर राष्ट्रीय महामहामार्ग आणि मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील महत्वाचे स्टेशन आहे. भंडारा शहरापासून १० कि़मी. अंतरावर वरठी रोड येथे प्रवासी रेल्वे स्थानक आहेत. तसेच काही वर्षांपुर्वी शहरात सुद्धा रेल्वे येत होती. आयुध निर्माणीसाठी ही रेल्वे भंडारा शहरातून जात होती. परंतु आता ही रेल्वे बंद करण्यात आली आहे. भंडारा शहर ते भंडारा रोड अशी शटल रेल्वे सुरू करण्याचीही मागणी अनेक वर्षांपासून आहे. या मागणीकडेही दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे भंडारा येथे रॅक पॉर्इंट सुरू करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून आहे. भंडारा शहरात रेल्वेची ६५ एकर जागा आहे. या रॅक पॉर्इंटसाठी रेल्वेच्या वतीने दोन-तीनदा पाहणी करण्यात आली. परंतु अद्यापर्यंत रॅक पॉर्इंटला मंजुरी दिली नाही.
याठिकाणी रॅक पॉर्इंट मंजुर झाल्यास शहरी व ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध होईल तसेच शेतकरी आणि व्यापाºयांना माल वाहतुक सोईची होणार आहे. यासाठी जिल्हाधिकाºयांना प्रेमचंद डोरले, संतोष राजगीरे, सुनिल लेंडे व शेकडो नागरिकांनी निवेदन दिले आहे. आता याप्रकरणी काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वरठी येथे सुपरफास्टला थांबा द्या
भंडारा या जिल्हा मुख्यालयाजवळ असलेल्या वरठीरोड रेल्वे स्टेशनवर सुपरफास्ट गाड्यांना थांबा नाही तब्बत २२ सुफरफास्ट गाड्या थांबत नाही. याठिकाणी ज्ञानेश्वरी, हावडा-हापा, हावडा-पोरबंदर, बिलासपूर-पुणे, एलटीटी-भुवनेश्वर, पुरी-शिर्डी, पुरी-अजमेर आदी सुपरफास्ट रेल्वेंना थांबा देण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच वरठी रेल्वेस्टेशनचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी निवेदनात केली आहे.