वाहनाच्या धडकेत रेल्वे फाटक तुटले; दोन तास वाहतूक ठप्प

By admin | Published: February 7, 2016 01:16 AM2016-02-07T01:16:44+5:302016-02-07T01:16:44+5:30

तुमसर रोड येथे एका अज्ञात वाहनाने रेल्वे फाटकाला धडक दिली. यात फाटक मध्यभागातून वाकली.

Railway gate breaks down; Two-hour traffic jam | वाहनाच्या धडकेत रेल्वे फाटक तुटले; दोन तास वाहतूक ठप्प

वाहनाच्या धडकेत रेल्वे फाटक तुटले; दोन तास वाहतूक ठप्प

Next

तुमसर रोड येथील घटना : फरार वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
तुमसर : तुमसर रोड येथे एका अज्ञात वाहनाने रेल्वे फाटकाला धडक दिली. यात फाटक मध्यभागातून वाकली. यामुळे तुमसर गोंदिया राज्य महामार्गावर सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली. रेल्वे प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करून फाटक दुरुस्त केली. ही घटना शनिवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास घडली.
तुमसर रोड येथे मुंबई - हावडा रेल्वे मार्गावरील फाटक क्रमांक ५३२ ला एका अज्ञात वाहनाने धडक मारली. धडकेत फाटक मध्यभागातून वाकली. धडक दिल्यावर वाहनचालक फरार झाला. अज्ञात वाहनचालकाविरोधात रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तुमसर गोंदिया राज्य महामार्ग वर्दळीचा आहे. दर पाच ते सात मिनिटांनी येथे रेल्वे फाटक बंद होते. प्रचंड वाहतुकीमुळे फाटकाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा येथे दिसतात. फाटक बंद होताना व उघडताना वाहनांची एकच वर्दळ सुरु होते. अशातच वाहनांची रेल्वे फाटकाला नेहमीच धडक दिल्याच्या घटना घडतात. रेल्वे प्रशासनाने या फाटकावर सीसीटीव्ही लावणे गरजेचे आहे. परंतु त्याची दखल अजूनपर्यंत घेतली गेली नाही. फाटक दुरुस्तीपर्यंत फाटकाच्या दुतर्फा रांगाच रांगा येथे लागल्या होत्या. याच मार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे वाहतुकीला रस्ता अरुंद पडत आहे. रेल्वे प्रशासनाने या फाटकावर कायमस्वरुपी रेल्वे पोलीस तैनात करण्याची गरज आहे.
दि. १२ फेब्रुवारी रोजी रेल्वे महाव्यवस्थापकांचा दौरा आहे. त्यानिमित्ताने रेल्वे स्थानक व परिसराचा कायपालट करणे सुरु आहे. दर महिन्याला या रेल्वे फाटकावर अपघात घडतात. रेल्वे हायटेक करण्याचे रेल्वे मंत्रालयाचे स्वप्न असून जागतिक दर्जाचे रेल्वे मार्ग व सुविधा देण्याची हमी सध्या केंद्र शासन देत आहे. मुंबी हावडा रेल्वे मार्ग तथा तुमसर गोंदिया राज्य महामार्ग अपघात प्रवण स्थळ बनले आहे. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Railway gate breaks down; Two-hour traffic jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.