रेल्वेच्या हादऱ्यामुळे वाढला भुस्खलनाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 10:03 PM2018-12-28T22:03:27+5:302018-12-28T22:03:41+5:30

देव्हाडी रेल्वे क्रॉसिंगजवळ उड्डाणपूल बांधकामाकरिता सिमेंट कॅम्प लावण्याचे काम सध्या सुरू आहे. याकरिता जेसीबीने १५ ते २० फुट खोल व २५ फुट रूंद खड्डा खोदला आहे. खड्ड्यामुळे रेल्वे ट्रॅकचे अंतर केवळ ८ ते १० फुट आहे. धडधड वाहतूक करणाºया रेल्वेगाड्यामुळे हादरे बसतात. सदर हादऱ्यामुळे खड्ड्यातील माती भूस्खलनाचा धोक्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर परिसर दलदलीचा आहे हे विशेष.

Railway hazard raises the risk of flooding | रेल्वेच्या हादऱ्यामुळे वाढला भुस्खलनाचा धोका

रेल्वेच्या हादऱ्यामुळे वाढला भुस्खलनाचा धोका

Next
ठळक मुद्देरेल्वे ट्रॅकही असुरक्षित : राष्ट्रीय मार्गावरही जड वाहतूक

मोहन भोयर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : देव्हाडी रेल्वे क्रॉसिंगजवळ उड्डाणपूल बांधकामाकरिता सिमेंट कॅम्प लावण्याचे काम सध्या सुरू आहे. याकरिता जेसीबीने १५ ते २० फुट खोल व २५ फुट रूंद खड्डा खोदला आहे. खड्ड्यामुळे रेल्वे ट्रॅकचे अंतर केवळ ८ ते १० फुट आहे. धडधड वाहतूक करणाºया रेल्वेगाड्यामुळे हादरे बसतात. सदर हादऱ्यामुळे खड्ड्यातील माती भूस्खलनाचा धोक्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर परिसर दलदलीचा आहे हे विशेष.
देव्हाडी रेल्वे क्रॉसिंग ५३२ वर सध्या रेल्वे उड्डाणपूलाचे बांधकाम सुरू आहे. रेल्वे फाटकाशेजारी रेल्वे कंत्राटदार लोखंडी कॅम्पची कामे करीत आहे. त्याकरिता खोल व रूंद असा खोल खड्डा जेसीबीने खोदकाम झाला आहे. सदर अवघ्या ८ ते २० फुटा अंतरावर तुमसर रोड-तिरोडी रेल्वे ट्रॅक असून त्यापलीकडे मुंबई हावडा रेल्वेट्रॅक आहेत. चोवीस तासात या रेल्वे मार्गावर १८० मालवाहतूक व प्रवाशी रेल्वेगाड्या धावतात. हजारो टन वजनाच्या रेल्वेगाड्या आहेत. रेल्वेगाड्या वाहतुकीदरम्यान परिसरातील जागेला हादरे बसतात.
खड्ड््यापासून चार ते पाच फुट अंतरावर तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्ग आहे. जड वाहतुकीचे ट्रक येथून २४ तास धावतात. निश्चितच यामुळे भुस्खलनाची शक्यता नाकारता येत नाही. खड्ड्याचा परिसरात तलावासारखी जागा आहे. दलदलीचा ही संपूर्ण जागा आहे. पावसाळ्यात तथा हिवाळ्यातही येथे पाणी साचून राहत होते. रेल्वे अभियंत्यांनी पाणी साचून राहत असल्याने अनेकदा माती परिक्षण केले होते. यामुळेही ही जागा निश्चितच धोकादायक आहे.
पाणी साचून राहिल्याने जागा दलदलीची राहते. सदर प्रकरणी गंभीरतेने घेण्यात गरज आहे. उड्डाणपूलाचे भव्य विस्तार बांधकामाकरिता महागाय मशीनने पाईल्सची कामे येथे करण्यात आली होती. दलदलीच्या जागेमुळे अनेक महिने सदर काम बंद होते. काही कंत्राटदाराने येथे पाठ फिरविली होती, अशी माहिती आहे. वरून जरी माती व ट्रॅक मजबूत दिसत असले तरी काळी माती केव्हा धोका देईल याचा नेम नाही.

Web Title: Railway hazard raises the risk of flooding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.