रेल्वे हाऊसफुल, लांब पल्ल्यासाठी आरक्षण मिळेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:36 AM2021-09-11T04:36:54+5:302021-09-11T04:36:54+5:30
मुंबई, पुण्याचे तिकीट मिळेना! कोरोनाच्या संसर्गामुळे पॅसेंजर आणि लाेकल गाड्या अद्यापही रेल्वे प्रशासनाने सुरू केलेल्या नाही. केवळ विशेष गाड्या ...
मुंबई, पुण्याचे तिकीट मिळेना!
कोरोनाच्या संसर्गामुळे पॅसेंजर आणि लाेकल गाड्या अद्यापही रेल्वे प्रशासनाने सुरू केलेल्या नाही. केवळ विशेष गाड्या सुरू असून त्यासुद्धा माेजक्याच रेल्वेस्थानकावर थांबत आहेत. आरक्षण मिळावे यासाठी प्रवासी फिल्डिंग लावून आहेत. यात मुंबई-हावडा या मार्गावरील आरक्षण मिळेनासे झाले आहे. तूर्तास तरी अनेक रेल्वे प्रवासी तिकिटासाठी वेटिंगवर आहेत.
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
भंडारा राेड रेल्वेस्थानकातून सध्या गाेंदिया-मुंबई एक्सप्रेस, गाेंदिया काेल्हापूर, मुंबई-हावडा, पुरी निझामुद्दीन एक्स्प्रेस
ना मास्क, ना साेशल डिस्टन्सिंग
काेराेनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर नागरिकांनी काेविड नियमांचे पालन करणे साेडून दिले काय असे रेल्वे स्थानकावरील दृश्य पाहून लक्षात येते. अनेक जण मास्कही लावताना दिसून येत नाही.
याशिवाय जिल्ह्यातून एकमेव पॅसेंजर गाडी सुरू असताना तेथे साेशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. काेराेना नियमांचे पालन करणे अत्यंत गरजे आहे. अन्यथा तिसऱ्या लाटेची शक्यता आहे.