फुलोऱ्यावरील धानाला पावसाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:27 AM2019-09-17T00:27:06+5:302019-09-17T00:27:30+5:30
गत १५ दिवसांपासून जिल्ह्यात दररोज पाऊस कोसळत आहे. साकोली तालुक्यासह लाखांदूर, पवनी आणि लाखनी तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. सध्या हलक्या प्रतीचा धान निसवला असून काही ठिकाणी तो फुलोºयावर आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : सततच्या पावसाचा फुलोºयावर आलेल्या धानाला फटका बसत आहे. धानाचे फूल जळत असल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे उच्च प्रतीच्या धानावर कीडीचे आक्रमण झाले आहे. पावसामुळे फवारणीही निष्प्रभ ठरत असून शेतकरी हवालदिल झाले आहे.
गत १५ दिवसांपासून जिल्ह्यात दररोज पाऊस कोसळत आहे. साकोली तालुक्यासह लाखांदूर, पवनी आणि लाखनी तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. सध्या हलक्या प्रतीचा धान निसवला असून काही ठिकाणी तो फुलोºयावर आला आहे. सुरूवातीला पावसाने दडी मारल्याने झालेला पाऊस पिकांसाठी समाधानकारक असला तरी आता मात्र सततच्या पावसाचा फटका हलक्याप्रतीच्या धानाला बसत आहे. साकोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात हलक्याप्रतीच्या धानाची लागवड करण्यात आली. सध्या फुलोºयावरील धानाला पावसाचा फटका बसत आहे. निसवून १५ ते २० दिवस झालेल्या धानाचे सर्वाधिक नुकसान होत आहे. फूल जळत असल्याने धान भरत नाही. त्याचा परिणाम उत्पादनात घट येण्यावर होणार आहे.
दुसरीकडे उच्चप्रतीचा धानही किडींच्या आक्रमणात सापडला आहे. विविध किडींचे आक्रमण झाले आहे. कीड नियंत्रणासाठी शेतकरी महागडे किटकनाशक फवारत आहे. परंतु फवारणी होत नाही तोच पावसाची सर कोसळते. त्यामुळे फवारणीचा कोणताही परिणामा किडींवर होत नाही. सातत्याने महागडी फवारणी करावी लागत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
सुरूवातीला पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. यापरिस्थितीतही शेतकºयांनी सिंचन करून धान जगविला. सप्टेंबर महिन्यात पावसाला जोरदार सुरूवात झाली. शेतकºयांच्या चेहºयावर समाधान दिसू लागले. मात्र गत १५ दिवसांपासून पाऊस थांबायचे नाव घेत नाही. त्यामुळे शेतकरी धास्तावलेला दिसत आहे.
कृषी विभागाकडून मार्गदर्शनाचा अभाव
धानपिकावर किडींचे आक्रमण झाले आहे. शेतकरी आपल्या पद्धतीने महागडी औषधी फवारत आहे. मात्र त्याचा फारसा परिणाम होत नाही. कीड नियंत्रणासाठी कोणते औषध फवारावे, याबाबत कृषी विभाग मार्गदर्शन करताना साकोली तालुक्यात दिसत नाही.