जिल्ह्यात गारपिटीसह पाऊस; रबी पिकाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 05:00 AM2021-12-29T05:00:00+5:302021-12-29T05:00:21+5:30

मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी ३.३० च्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले. पावसासह गाराही पडल्या. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. मंगळवारी असलेल्या आठवडी बाजारातही नागरिकांची तारांबळ उडाली. शेतातील पिकांचेही नुकसान झाले. शहरातील सखल भागात काही ठिकाणी पाणी साचले. तर काही घरात पाणी शिरले. मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक वादळी वारा व गारासह तुमसर शहर व तालुक्यात काही ठिकाणी पाऊस पडला.

Rain with hail in the district; Rabi hit the crop | जिल्ह्यात गारपिटीसह पाऊस; रबी पिकाला फटका

जिल्ह्यात गारपिटीसह पाऊस; रबी पिकाला फटका

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पुन्हा एकदा वेधशाळेचा अंदाज खरा ठराला आहे. मंगळवारी दुपारी मेघगर्जनेसह जिल्ह्यात ठिकठिकाणी गारांसह पाऊस बरसला. तुमसर, मोहाडी तालुक्यात गारपिटीने रबी पिकाला फटका बसल्याची प्राथमिक माहिती आहे. भंडारा शहरात सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली. जवाहरनगर, लाखनी, पालांदूर, पवनी  व साकोलीतही पावसाने दमदार हजेरी लावली.
तुमसर तालुक्यातील पवनारा येथे दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरूवात झाली. गारांचा पाऊस बरसला. परत सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरवात झाली. या पावसामुळे भाजीपाला पिकाला नुकसान झाल्याची माहिती आहे. 
मोहाडी तालुक्यातील मोहाडी शहर, उसर्रा, लोहारा, गायमुख, सोरणा, जांब व कांद्री, वरठी परिसरातही गारांसह पाऊस बरसला. या पावसामुळे टमाटर, मिरची, कोबी पिकांचे नुकसान झाले आहे. या पावसाचा गहू पिकाला  फायदा होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 
आंधळगाव येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, आंधळगाव व परिसरात दुपारी मुसळधार पावसाला सुरवात झाली. गारपिटीचा तडाखा रबी पिकांना बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांसह भाजीपाला उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे. 
तुमसर तालुक्यात गारांसह पाऊस
मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी ३.३० च्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले. पावसासह गाराही पडल्या. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. मंगळवारी असलेल्या आठवडी बाजारातही नागरिकांची तारांबळ उडाली. शेतातील पिकांचेही नुकसान झाले. शहरातील सखल भागात काही ठिकाणी पाणी साचले. तर काही घरात पाणी शिरले.
मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक वादळी वारा व गारासह तुमसर शहर व तालुक्यात काही ठिकाणी पाऊस पडला. त्यामुळे अधिक थंडी जाणवू लागली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी आकाशात ढगांनी गर्दी करून विजेच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. तुमच्या शहरातील विनोबा भावे नगरात सखल भागात पाणी साचले होते तर काहींच्या घरात पाणी शिरले. तालुक्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याची माहिती आहे. तालुक्याच्या सीमेवरील काही गावात मोठ्या प्रमाणात गारा पडल्या. 
अनेक शेतकऱ्यांच्या सध्या धानाचे चुरणे सुरू आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या धान हा शेतात ओला झाला. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. धान ओले होऊ नये म्हणून अनेक शेतकरी धावपळ करताना दिसले. फळबागा लागवड करणारे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सायंकाळी पुन्हा पावसाला सुरूवात झाली.

उघड्यावरील धानपोती धोक्यात
- खरीप हंगामाची कामे वेळेवर आटोपली असली तरी धानाची खरेदी मात्र वेळेवर होवू शकली नाही. धान खरेदी केंद्र वेळेवर सुरू न झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांचे धान शेतशिवारात किंवा धान खरेदी केंद्र परिसरात पडून होते. आज आलेल्या दमदार पावसाने उघड्यावरील धानपोती धोक्यात आले आहेत. आधीच अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करीत असताना ओले झालेले धान शासन घेणार काय, असा सवालही उपस्थित झाला आहे. पाखर झालेल्या धानाची चवही कमी होत असल्याने बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत सापडणार आहे.

धुसाळा येथे   बालकाचा मृत्यू
- मोहाडी तालुक्यातील धुसाळा नवेगाव शेतशिवारात मेघगर्जनेसह पाऊस बरसला. यात आजोबांसोबत म्हशी चराईसाठी गेलेल्या नऊ वर्षीय नातवाचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला. नयन परमेश्वर पुंडे असे मृत बालकाचे नाव आहे. याचवेळी शेतात बांधलेल्या एक बैलही ठार झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली. नयन हा आंधळगाव येथील शाळेत इयत्ता तिसऱ्या वर्गाचा विद्यार्थी असल्याची माहिती आहे. 

 

Web Title: Rain with hail in the district; Rabi hit the crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.