पावसाने धानपीक धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 10:54 PM2018-07-10T22:54:12+5:302018-07-10T22:54:34+5:30
गेल्या पाच सहा दिवसापासून दररोज दमदार हजेरी लावणाऱ्या पावसामुळे शेतातील पाणी निघणे दुरापास्त झाल्यामुळे पऱ्हे सडण्याच्या मार्गावर असून शेतकरी चिंतातूर झाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
विरली (बु.) : गेल्या पाच सहा दिवसापासून दररोज दमदार हजेरी लावणाऱ्या पावसामुळे शेतातील पाणी निघणे दुरापास्त झाल्यामुळे पऱ्हे सडण्याच्या मार्गावर असून शेतकरी चिंतातूर झाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. मृग नक्षत्रात शेतकऱ्यांनी पऱ्हे घातले. मात्र पऱ्हे उगवल्यानंतर आठवडाभरातच पावसाने पाच सहा दिवस सातत्याने हजेरी लावली. परिणामी शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून हे पाणी शेतातून निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेताना जलाशयाचे स्वरुप आले असून पाच सहा दिवस साचलेल्या पाण्यामुळे पऱ्हे सडण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले असून या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बेशरमची झाडे वाढलेली आहेत. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी हे नाले बुजलेले आहेत. पावसाळ्यामुळे या नाल्यांमधून पाणी वाहन जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे.
तसेच या मार्गातील गोसेखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालवा वितरिकेचे काम ठिकठिकाणी रखडलेले आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होणे कठीण झाले आहे. परिणामी काठावरील आणि वितरिकेच्या शेजारील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे. प्रशासनाच्या दिरंगाईचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. या पावसामुळे ज्या पंपधारक शेतकºयांनी हंगामाच्या सुरुवातीलाच पऱ्हे घातले होते. पंपधारक शेतकऱ्यांचे रोवणे जोमात सुरु आहेत.