दुष्काळ घोषित करण्यासाठी निवेदनांचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 01:14 AM2019-07-26T01:14:56+5:302019-07-26T01:15:27+5:30
पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरविल्यामुळे पेरणीसह रोवणी देखील मातीमोल झाली आहे. शेतकरी अस्मानी संकटात सापडला असून जिल्ह्यात कोरडा दुष्काळ घोषीत करावा, या मागणीसाठी दररोज निवेदनांचा पाऊस पाडला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरविल्यामुळे पेरणीसह रोवणी देखील मातीमोल झाली आहे. शेतकरी अस्मानी संकटात सापडला असून जिल्ह्यात कोरडा दुष्काळ घोषीत करावा, या मागणीसाठी दररोज निवेदनांचा पाऊस पाडला जात आहे. शासन, प्रशासनाने परिस्थितीची जाणीव लक्षात घेवून दुष्काळग्रस्त जिल्हा घोषीत करण्यासाठी पाऊल उचलण्याची नितांत गरज आहे.
सिल्ली येथे टँकरने दिले पºह्यांना पाणी
सिल्ली : पावसाच्या दांडीमुळे भंडारा तालुक्यासह जिल्ह्यात धान उत्पादक शेतकरी कमालीचा अस्वस्थ झाला आहे. पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांचे धानाची पºहे सुकले. काही सुकण्याच्या मार्गावर आहेत, तर उर्वरित कसेबसे जगविण्याचा आटापिटा सुरू असल्याचेच चित्र आहे.
याच पार्श्वभुमीवर भंडारा तालुक्यातील सिल्ली (आंबाडी) येथील रहिवाशी संतोष वंजारी यांनी पºह्यांना वाचविण्यासाठी ट्रॅक्टरच्या सहाय्याने टँकमधून पाणी नेवून करपलेल्या पºह्यांना पाणी देवून वाचविण्याचा केविलवाना प्रयत्न केला. यावेळी गावातीलच अंकुर मेश्राम व प्रमोद बावनकुळे यांनी सुध्दा पºह्यांना पाणी देण्यास वंजारी यांना मदत केली. रोवणी केली तरी हाती पीक येईपर्यंत धान पिकाला मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज भासते. अडचणीच्या वेळी पिकाला जीवदान देणारे पाणी प्रकल्पातून अथवा तलावातून मिळेल काय? अशा एक ना अनेक विचारांनी शेतकरी प्रचंड तणावात आला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाची दडी, पावसाने उशिरा हजेरी लावणे, हे नवीन नाही.
जांब येथे करपलेले पीक वाचविण्यासाठी धडपड
जांब (लोहारा) : पाऊस पडत नसल्याने व तापमान वाढल्याने धान पºहे जळुन राख होत आहेत. धानाचे पºहे वाचविण्यासाठी काही शेतकरी टँकरने पाणी देऊन पºहे वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. मोहाडी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावी, अशी मागणी आहे.
ओबीसी छावा संग्राम परिषद, भंडारा व पवनी
पवनी : भंडारा जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. भातपिकासाठी टाकलेले पºहे वाळलेले आहेत. दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.
हंगामाला उशीर झाल्याने दुबार पेरणी करून शेतकऱ्यांना फारसा उपयोग होणार नाही. ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे त्या शेतकºयांना २४ तास विद्युत पुरवठा होत नाही. त्यामुळे शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनस्तरावर शेतकºयांच्या पिकांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले नाही. शेतीचे सर्वेक्षण करून जिल्हा दुष्काळ घोषित करण्यात यावा अशी मागणी ओबीसी छावा संग्राम परिषद भंडारा व पवनी तालुका यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष सुभाष आजबले, भंडारा जिल्हा महामंत्री बालू ठवकर, पवनी तालुका महामंत्री मेघराज जोगवे (जवान), पवनी शहराध्यक्ष अमोल लांजेवार, अमोल जीभंकाटे, लोकेश तलवारे, दिनेश हटवार, संतोष राऊत, राज शिरसागर, शुभम देशमुख, सौरभ जीभकाटे, दिलीप शेंडे, अतुल भुरे, संजय साळवे, भिक्षूक वंजारी, मंथन गेडाम, पांडुरंग चौके, स्वप्निल तिघरे, अल्ताफ पटेल, आकाश हटवार, छावा संग्राम परिषदचे कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस, लाखनी
लाखनी : सततच्या अस्मानी संकटामुळे शेतकºयांची अवस्था अत्यंत दयनीय व हलाखीची झालेली आहे. तसेच यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे अक्षरश: पºहे करपलेली आहेत. लावलेल्या पºह्यांना जगवण्यासाठी शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशाही अवस्थेत लाखनी तालुक्यात केवळ १० टक्के रोवणी झाली आहे. संपूर्ण लाखनी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा. तसेच सततच्या नापिकी व दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे शेतकरी सावकारांच्या उंबरठ्यावर उभा आहे. त्यामुळे मागील पाच वर्षात शेतकरी आत्महत्येत प्रचंड वाढ झालेली आहे. या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकºयांनी टोकाची भूमिका घेण्याच्या आधी शेतकºयांची सरसकट कर्ज माफी करून तात्काळ सातबारा कोरा करण्यात यावा, अन्यथा शासनाच्या विरोधात तीव्र जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून दिला आहे. शेतकºयांची सरसकट कर्ज माफी करून सातबारा कोरा करण्यात यावा, शेतकºयांचे संपूर्ण वीज बिल माफ करण्यात यावे, कृषी भारनियमन बंद करून २४ तास वीज उपलब्ध करून देण्यात यावी, धानाला तीन हजार रूपये प्रती क्विंटल भाव देण्यात यावा व राज्य शासनाने ५०० रूपये प्रति क्विंटल बोनस देण्यात यावा, तसेच स्वामिनाथन आयोगानुसार हमी भाव देण्यात यावा, शेतकºयांना एकरी २५ हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, रोजगार हमी योजनेतून शेतीची कामे करण्यात यावी, पालांदूर येथील बायपास रस्त्याचे काम तात्काळ सुरू करून संबंधित शेतकºयांना अविलंब मोबदला देण्यात यावा, नेरला उपसा सिंचन योजनेचे पाणी पालांदूर परिसरात सोडण्यात यावा, अशा मागणींचे निवेदन जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे व प्रदेश महासचिव राष्ट्रवादी काँग्रेस धनंजय दलाल यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री यांना तहसीलदार यांचेमार्फत देण्यात आले.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष डॉ. विकास गभने, शहर अध्यक्ष धनू व्यास, जेष्ठ नेते दामाजी खंडाईत, नागेश पाटील वाघाये, माया अंबुले, नितीन निर्वाण, नरेश ईलमकर, अजय पुडके, अर्चना ढेंगे, चंद्रकला बडोले, सुनीता खेडीकर, नूतन मेंढे, शशिकांत भोयर, राजेश शिवणकर, राजकुमार अंबुले, गोपाल साठवणे, मुरलीधर भदाडे, राजेंद्र मेश्राम, विवेक गिºहेपुंजे, मोरेश्वर दोनोडे, कैलास वरकडे, आशिफ खान पठाण, पंकज खंडाईत, राजेश देशमुख, चेतन निर्वाण, अमोल गभने, विजय चाचेरे, आकाश गहरवार, राजन तितिरमारे, संदीप गिºहेपुंजे, रमेश मेश्राम, नोगेश मोहनकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.