सात वर्षांत पावसाने वार्षिक सरासरीही गाठली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:21 AM2021-07-23T04:21:54+5:302021-07-23T04:21:54+5:30

जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात तलाव असून, या तलावाची संचयक्षमता माेठी आहे; परंतु अलीकडल्या काळात तलावांमध्ये पुरेसे पाणी संचित हाेत नाही. ...

Rainfall in seven years has not even reached the annual average | सात वर्षांत पावसाने वार्षिक सरासरीही गाठली नाही

सात वर्षांत पावसाने वार्षिक सरासरीही गाठली नाही

Next

जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात तलाव असून, या तलावाची संचयक्षमता माेठी आहे; परंतु अलीकडल्या काळात तलावांमध्ये पुरेसे पाणी संचित हाेत नाही. तलावातील गाळ हे मुख्य कारण असले तरी पाणलाेट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी हाेत असल्याचा हा परिणाम आहे. वनसंपदेने नटलेल्या भंडारा जिल्ह्यात अलीकडच्या काळात पावसाचे प्रमाण कमी हाेणे हे आगामी काळासाठी धाेक्याची घंटा आहे.

बाॅक्स

सन २०१३ मध्ये १३२ टक्के पावसाची नाेंद

सात वर्षांपूर्वी म्हणजे २०१३ साली जिल्ह्यात सर्वत्र धाे-धाे पाऊस बरसला हाेता. १६८४.३४ मि.मी. म्हणजे १३२ टक्के पाऊस काेसळला हाेता. वार्षिक सरासरीच्या ३२ टक्के पाऊस त्या वर्षी काेसळला. त्यानंतर आजपर्यंत एकदाही पावसाने वार्षिक सरासरी गाठली नाही.

बाॅक्स

मध्यप्रदेशातील पावसाने येताे महापूर

भंडारा जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण हाेण्याला मध्यप्रदेशात पडणारा पाऊस आणि मध्यप्रकल्पातील अतिरिक्त पाणी कारणीभूत आहे. गतवर्षी भंडारा जिल्ह्यात आलेल्या महापुराने हाहाकार उडविला हाेता. शेकडाे हेक्टरवरील पीक नष्ट झाले हाेते. विशेष म्हणजे गतवर्षी जिल्ह्यात ८९ टक्के पाऊस झाला हाेता. मात्र महापूर आला. मध्यप्रदेशातील संजय सराेवरातील पाणी साेडल्याने ही स्थिती निर्माण झाली हाेती.

Web Title: Rainfall in seven years has not even reached the annual average

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.