पावसाने पुन्हा केला शेतकऱ्यांचा घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 06:00 AM2020-01-01T06:00:00+5:302020-01-01T06:00:19+5:30

दहा दिवसांमध्ये शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट कोसळले आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयातर्फे याबाबत सूचनाही देण्यात आली होती. वेधशाळेने वर्तविलेला अंदाज खरोखर ठरला. जिल्ह्यात कुठेही गारपीट पडली नसली तरी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते केले आहे.

The rains again hit the farmers | पावसाने पुन्हा केला शेतकऱ्यांचा घात

पावसाने पुन्हा केला शेतकऱ्यांचा घात

Next
ठळक मुद्देशेकडो क्विंटल धानपोती ओली : खरेदी केंद्रांवर सुविधांचा अभाव, भाजीपाला पिकांचेही नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आठ दिवसांच्या रजेनंतर पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. परिणामी विक्रीसाठी आणलेली शेकडो क्विंटल धान खरेदी केंद्रांवर ओली झाली. सरत्या वर्षातील शेवटच्या दिवशीही बरसलेल्या पावसाने शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. विशेष म्हणजे प्रती क्विंटल २५१० रुपये धानाला भाव मिळत असल्याने खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे.
दहा दिवसांमध्ये शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट कोसळले आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयातर्फे याबाबत सूचनाही देण्यात आली होती. वेधशाळेने वर्तविलेला अंदाज खरोखर ठरला. जिल्ह्यात कुठेही गारपीट पडली नसली तरी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते केले आहे.
लाखांदूर तालुक्यातील बारव्हा परिसरात अवकाळी पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेली धानपोतींवर आच्छादन घालण्यासाठी शेतकºयांची तारांबळ उडाली. एवढे करूनही धानपोती ओल्या झाल्या. शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळून प्रतीक्विंटल २५१० रुपये भाव मिळत असल्याने शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
भंडारा शहरासह तालुक्यात सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास पावसाच्या सरी बरसल्या. अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. तालुक्यातील धान खरेदी केंद्रावरही शेतकऱ्यांची चांगलीच गोची झाली. खरेदी केंद्राकडे घेऊन जाणारे धानही ओले झाले. याशिवाय तुमसर, मोहाडी, जांब, लोहारा, बारव्हा, नाकाडोंगरी परिसर, मासळ, आंधळगाव, जवाहरनगर, पवनी, लाखनी शहर व साकोली शहरासह ग्रामीण भागात पाऊस बरसला. अचानकपणे आलेल्या पावसाने जिल्ह्यात मंगळवारी काही ठिकाणी भरलेल्या आठवडी बाजारावरही परिणाम झाला

हुडहुडी वाढली
मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असताना मंगळवारी सायंकाळी बरसलेल्या अवकाळी पावसाने वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे. आधीच धुक्यामुळे थंडीत वाढ झाली असताना बरसलेल्या पाण्यामुळे अनेकांचे नियोजन कोलमडले आहे. या पावसाने थर्टीफस्टच्या नियोजनावरही पाणी फेरले आहे. दुसरीकडे वाढत्या थंडीमुळे उबदार कपड्यांची मागणी वाढली असून बाजारपेठेत शॉल, स्वेटर, मफलर व दुपट्टे विक्रीसाठी गर्दी होत असल्याचे दृष्य आहे.

Web Title: The rains again hit the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस