भंडारा जिल्ह्याला पावसाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 01:08 PM2020-10-08T13:08:56+5:302020-10-08T13:09:18+5:30
Agriculture Bhandara News भंडारा जिल्ह्यात बुधवारी दुपारी परतीचा जोरदार पाऊस बरसला असून या पावसाने धान पीक उद्ध्वस्त झाले आहे.
ठळक मुद्देधान पीक उद्ध्वस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात बुधवारी दुपारी परतीचा जोरदार पाऊस बरसला असून या पावसाने धान पीक उद्ध्वस्त झाले आहे. हाताशी आलेला धान पावसात उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी चिंतेत पडले आहे.
जिल्ह्यात सर्वदूर बुधवारी १.३० वाजताच्या सुमारास जोरदार पावसाला सुरूवात झाली. तुमसर, मोहाडी, भंडारा, लाखनी, लाखांदूर, पवनी आणि साकोली तालुक्यात सर्वदूर पाऊस बरसला. तब्बल दोन तास बरसलेल्या या पावसाने शेतात कापणीला आलेला धान उद्ध्वस्त झाला. काही शेतकऱ्यांनी कापूण ठेवलेल्या धानाच्या कडपा ओल्या झाल्या आहे. आधीच संकटाचा सामना करणाºया शेतकऱ्यांना परतीच्या पावसानेही फटका दिला.