मैत्रय बौद्ध विहार येथे वर्षावास समाप्ती कार्यक्रम

By admin | Published: October 28, 2016 12:32 AM2016-10-28T00:32:45+5:302016-10-28T00:32:45+5:30

नाशिक नगर येथील मैत्रेय बौद्ध विहारात १६ आॅक्टोबर रोजी श्रामनेरी सुमेधा यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

Rainy Riding Program at Maitri Buddhist Vihar | मैत्रय बौद्ध विहार येथे वर्षावास समाप्ती कार्यक्रम

मैत्रय बौद्ध विहार येथे वर्षावास समाप्ती कार्यक्रम

Next

मान्यवरांचे मार्गदर्शन : आरोग्य शिबिरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन
भंडारा : नाशिक नगर येथील मैत्रेय बौद्ध विहारात १६ आॅक्टोबर रोजी श्रामनेरी सुमेधा यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरूवात बुद्ध वंदनेने झाली. त्यानंतर बाल संस्कार शिबिराच्या मुलांनी बुद्ध देवा तुझी ज्ञान गंगा, मार्ग दावी आम्हा प्रसंग हे स्वागत गीत गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
याप्रसंगी भिक्खुनी सुमेधा यांनी भगवान बुद्धने धम्मचक्र प्रवर्तन वेळी आपल्या पंचवर्णीय भिक्खूंना काय सांगितले यावर त्यांनी सखोल माहिती सांगितली. त्यांनी असे सांगितले की, धम्मचक्र प्रवर्तनाच्या वेळी तथागतांनी भिक्खुंना सांगितले की, दोन अतिथींको टालो, एक म्हणजे काया, क्लेषाचा मार्ग, दुसरा भोग विलासाचे मार्ग, या दोन्ही गोष्टी टाळून मध्यम मार्गाचा अवलंब करा.
धम्ममार्गावर जीवन जगण्यासाठी त्यांनी पाच मापदंड दिले आहेत. एक जो पंचशील युक्ती जीवन जगतो, तो स्वत:ला शुद्ध करतो. तिसरे आर्यअष्टांगीक मार्ग म्हणजे अविद्या नष्ट करणे, म्हणजे चार आर्यसत्व अंगीकार करणे व पाचवी दहा पामिता तंतोतंत पाळणे. यामुळे भिक्खु, भिक्खुनी, उपासक, उपासिका यांना वर्षावासाला काळ हा चारित्रीक बळ प्राप्त करण्याचा काळ आहे. या काळात चित्तांची वाईट सवय सोडायची असते.
प्रत्येकाने उपोसथ व्रत धारण करून स्वत:च्या काया, वाचा, मनाची शुद्धी करावयाची असते असे त्यांनी सांगितले. त्यानंतर स्मृतिशेष विलास बनकर यास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ डॉ. सागर गणवीर यांचे एक दिवसीय शिबिर घेण्यात आले. यानंतर बाल संस्कार शिबिराच्या लहान मुलांनी विशाखाचे औदार्य यावर एक नाटीका सादर केली. अ‍ॅड. विनय मोहन पशिने यांनी वर्षावास समारोपीय कार्यक्रमप्रसंगी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर वर्षावास कालावधीसंबंधी निशा डोंगरे, शारदा देशभ्रतार, संजीवनी आंभोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संचालन प्रतिभा मेश्राम व इंदू गणवीर यांनी प्रास्ताविक सुशिला शहारे तर आभार अरुणा शहारे यांनी केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंदू गणवीर, सुशिला शहारे, अंजिरा नागदेवे, ज्योती सतदेवे, लिला वासनिक, शारदा देशभ्रतार, निमिमा पाटील, माया बागडे, जितू मेश्राम, प्रफुल्ल, कोटांगले, प्रफुल्ल देशभ्रतार, प्रशांत देशभ्रतार, पिंटू अंबादे, भुपेश शेंडे यांनी मोलाचे सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Rainy Riding Program at Maitri Buddhist Vihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.