राजेगाव - मोरगाव येथील चिखलाने माखलेला रस्ता धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:39 AM2021-09-23T04:39:58+5:302021-09-23T04:39:58+5:30
नाना पटोले यांना निवेदन : रस्ता दुरुस्तीची विलास वाघाये यांची मागणी लाखनी : तालुक्यातील राजेगाव मोरगाव या दोन गावांना ...
नाना पटोले यांना निवेदन : रस्ता दुरुस्तीची विलास वाघाये यांची मागणी
लाखनी : तालुक्यातील राजेगाव मोरगाव या दोन गावांना जोडणारा रस्ता वाहन चालकांसाठी मृत्युमार्ग बनलेला आहे. रस्त्यावर मोठमोठी खड्डे पडलेली असून पाणी साचलेले आहे. गावातील लोकांवर दुसऱ्या पर्यायी मार्गाचा उपयोग करणे सुरू केले आहे. दुसऱ्या गावाहून येणारे नागरिक याच मार्गाने जातांना त्रास सहन करावा लागतो आहे. या रस्त्याचे बांधकाम विभागाने तत्काळ खडीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी मध्यवर्ती बँकेचे संचालक विलास वाघाये पाटील यांनी केली आहे.
या मार्गाचे डांबरीकरण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. आमदार नाना पटोले यांच्याकडे रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे. या रस्त्याने अवजड वाहने जात असल्याने रस्ता पूर्णपणे फुटलेला असल्याने पादचाऱ्यांना व दुचाकीस्वारांना प्रवास करणे कठीण होत असल्याचे विलास वाघाये यांनी स्पष्ट केले आहे. या मार्गाने तत्काळ डांबरीकरण करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा विलास वाघाये यांनी दिला आहे.
220921\img20210920143729.jpg
photo