राजेगाववासीयांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 12:52 AM2019-01-25T00:52:42+5:302019-01-25T00:53:35+5:30
तालुक्यातील राजेगाव (एमआयडीसी) ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या हमेशा (रिठी) गावातील जमिनीवर अतिक्रमण करून २६ एकरावर पक्के बांधकाम करून कारखाना उभारलेला आहे. राजेगाव येथील तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा व कराची रक्कम अदा करण्यात यावी,......
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तालुक्यातील राजेगाव (एमआयडीसी) ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या हमेशा (रिठी) गावातील जमिनीवर अतिक्रमण करून २६ एकरावर पक्के बांधकाम करून कारखाना उभारलेला आहे. राजेगाव येथील तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा व कराची रक्कम अदा करण्यात यावी, या मागणीसाठी राजेगाववासीयांनी गुरुवारपासून अशोक लेलँड कारखान्यासमोर साखळी उपोषणाला प्रारंभ केला आहे.
चिखली हमेशा (रिठी) येथील गट नं. १४७, १५७ व ५५ वर १९८२ ला २६ एकर जमिनीवर अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला अनेकदा न्यायाची मागणी केली. मात्र अद्यापही न्याय मिळाला नाही. जोपर्यंत कारखाना व्यवस्थापन राजेगाववासीयांच्या मागण्या पूर्ण करणार नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला. उपोषणापुर्वी सभेचे आयोजन करण्यात आले. सभेला सामाजिक कार्यकर्ते शशीकांत भोयर, रिपब्लिकन सेनेचे अचल मेश्राम, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मने, योगेश घाटबांधे, कुंदन शेंडे आदी उपस्थित होते. त्यांनी कारखाना प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला.
उपोषणात अशोक शेंडे, प्रशांत झंझाड, अतुल धांडे, आनंदराव गंथाडे, शालिक गंथाडे, वसंता वासनिक, अविनाश शेंडे, सुशिल मेश्राम, समीर देशपांडे, श्रीकांत देशपांडे, तुकाराम झलके, अजय बुंदेले, धवल मोहतुरे, अनमोल मेश्राम, सुनिल खोब्रागडे, मिलिंद मेश्राम, दिपक सार्वे, राजू शेंडे, देवांगणा खोब्रागडे, रेखा वासनिक, संदीप वासनिक, संगिता नागदेवे आदी सहभागी होते.