राजू कारेमोरे यांच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 15:04 IST2025-01-10T15:04:25+5:302025-01-10T15:04:47+5:30

Bhandara : चरण वाघमारे यांच्याकडून याचिका दाखल

Raju Karemore's election challenged in High Court | राजू कारेमोरे यांच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान

Raju Karemore's election challenged in High Court

लोकमत न्यूज नेटवर्क 
भंडारा :
महाराष्ट्रात सगळीकडे विधानसभा निवडणुकी संबंधात चर्चा सुरू असताना तुमसर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी राजू कारेमोरे यांच्या विजयाला आव्हान दिले आहे. यावर काय निर्णय लागणार, याकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे.


२०२०-२०२१ ला राजू कारेमोरे हे आमदार असताना स्वतःच्या आरके राईस उद्योग नावाने धान भरडाई करून तांदूळ पुरवठा करण्याचा कंत्राट त्यांनी घेतले. त्यावर मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने जिल्हा मार्केटिंग अधिकारी आणि राज्यसरकारच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी करारनाम्यावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.


त्याचा आधार घेत तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याची दखल घेत राज्यपालांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे कार्यवाहीसाठी प्रकरण पाठविले होते. या प्रकरणी निवडणुकीपूर्वी निर्णय दिला असता, तर कारेमोरे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास पात्र ठरले नसते, असे याचिकेत म्हटले आहे. 


कारेमोरे यांच्या निवडीला उच्च न्यायालय नागपूर येथे आव्हान देणारी ही याचिका चरण वाघमारे यांच्या वतीने अॅड. अनिरुद्ध चांदेकर, संदीप सिंह, ऋषिकेश मैडीलवर व किशोरी डोंगरवार यांनी ही याचिका दाखल केली आहे. 


अनेक मुद्यांचा याचिकेत समावेश 
निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्यावर आरोग्य शिबिराचे विना परवानगी आयोजन करणे, महाप्रसादाचे आयोजन करणे, किटचे वाटप करणे, पैसे वाटप करणे, या आरोपाचे तुमसर, आंधळगाव, मोहडी, सिहोरा या पोलिस ठाण्यात आचारसंहिता उलंघनप्रकरणी ११ गुन्हे दाखल असल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले आहे. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश असताना, गोपनीयतेचा भंग करून तक्रारकर्त्याचे नाव उघड करणे, त्यावर निवडणूक आयोगाने कुठलीही कार्यवाही न करणे, मतमोजणीनंतर ५ बूथच्या व्हीव्हीपॅटच्या मोजणीसाठी नियमानुसार शुल्क भरूनही मोजणी न करणे, जिल्हाधिकारी यांना सीसीटीव्ही व व्हिडीओग्राफी पुरविण्याची मागणी करूनसुद्धा न पुरविणे इत्यादी मुद्द्यांचा या याचिकेत समावेश करण्यात आला आहे.


 

Web Title: Raju Karemore's election challenged in High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.